Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रुग्णांच्या आरोग्यासोबतच स्वतःचे ‘आर्थिक आरोग्य’ जपा; डॉक्टरांच्या आर्थिक सक्षमतेसाठी ओतूरमध्ये ‘मास्टरक्लास’; तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचे धडे
आर्थिक

रुग्णांच्या आरोग्यासोबतच स्वतःचे ‘आर्थिक आरोग्य’ जपा; डॉक्टरांच्या आर्थिक सक्षमतेसाठी ओतूरमध्ये ‘मास्टरक्लास’; तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचे धडे

ओतूर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’ विषयावर चर्चासत्र संपन्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

ओतूर – 
युद्धजन्य अशा जागतिक अस्थिर परिस्थितीतही भारत आर्थिकदृष्ट्या ‘रायझिंग स्टार’ असून २०२५-२०३० पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असा आशावाद ओतूर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. नाशिक येथील आर्थिक विश्लेषक समीर नाईक व सुनील कडलग यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रविवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी राज लॉन्स येथे आयोजित या चर्चासत्राची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वक्ते समीर नाईक, सुनील कडलग, डॉ. राहुल तांबे, डॉ. योगेश तांबे, डॉ. शशांक फापाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओतूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित काशिद होते. याप्रसंगी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ओतूर डॉक्टर्स असोसिएशनने उपविजेतेपद पटकावल्याबद्दल संघाला अतिथींच्या शुभहस्ते ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
चर्चासत्रात मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी सांगितले की, जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था जीडीपीनुसार जपान आणि ब्रिटनला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत असल्याने भारत जगासाठी आश्वासक गुंतवणूक केंद्र बनले आहे. यामुळे परदेशात स्थायिक होऊन पैसा कमावण्याचा विचार करणारी भारतीय बुद्धिमत्ता भविष्यात भारतातच करिअरसाठी स्थिरावेल, असा सूरही या चर्चासत्रात उमटला.
सुनील कडलग यांनी रुग्णांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांनी बदलत्या काळात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित राहण्यासाठी म्युच्युअल फंड, जीवन विमा आणि आरोग्य विमा या द्वारे कुटुंबाचे नियोजन कसे करावे, यावर सखोल मार्गदर्शन केले. वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी आता पारंपारिक मुदत ठेवी (FD) कालबाह्य ठरत असून पेन्शनच्या समस्यांवर मात करण्यासाठी नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कसे असावे, या संदर्भात सुनील कडलग यांनी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. समीर नाईक यांनी आधुनिक आर्थिक संकल्पना, नियोजनाचे बदलते स्वरूप आणि आर्थिक शिस्तीचे महत्त्व विशद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अमित काशिद यांनी येत्या २५ जानेवारी रोजी रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर ओतूर येथे ‘रथसप्तमी सूर्यनमस्कार संकल्प – ८ ते १०८ सूर्यनमस्कार’ या अभिनव आरोग्य उपक्रमाची घोषणा केली. तरुण पिढीमध्ये व्यायामाची संस्कृती रुजावी हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे विश्वस्त डॉ. योगेश तांबे, डॉ. युवराज ढमाले, डॉ. शशांक फापाळे, डॉ. गणेश नायकोडी, एम.एफ.डी. आदित्य कडलग, एन. जे. इंडिया इन्व्हेस्ट प्रा. ली. चे आकाश बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांच्या वतीने डॉ. पुरुषोत्तम बोऱ्हाडे, डॉ. वैभव गायकर व डॉ. संजय वेताळ यांनी विचारलेल्या शंकांना मान्यवरांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचा परिचय डॉ. स्वाती तांबे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. रोहिणी गायकर यांनी केले तर डॉ. सोनल फापाळे यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 489
आर्थिक चर्चासत्र सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

01/08/2026

आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

29/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.