Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रवरा नदीपात्रात वाळू चोरांचा धुमाकूळ; संगमनेर पोलिसांचा मोठा छापा, ७ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

प्रवरा नदीपात्रात वाळू चोरांचा धुमाकूळ; संगमनेर पोलिसांचा मोठा छापा, ७ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2026Updated:13/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

संगमनेर तालुक्यातील पिंपरणेमध्ये (संगमनेर) प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ६० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण सात जणांना अटक केली आहे.

या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, पिंपरणे गावच्या शिवारात नदीपात्राच्या दक्षिण बाजूला असलेल्या पुलाजवळ ताहीर शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने जेसीबी आणि ट्रॅक्टरचा वापर करून चोरून वाळू वाहतूक करत आहे.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) पहाटे १२:४५ च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी नदीकाठी वाहने लावून वाळू उपसा सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे सुरज संजय पवार (वय २२, रा. घुलेवाडी, यशोदिप थिएटर जवळ), विशाल राजू रणशूर (वय २०, रा. घुलेवाडी), ऋषीकांत कारभारी वर्षे (वय २८, रा. कनोली), संतोष पंढरीनाथ भवर (वय ४०, रा. जोर्वे), शशिकांत शिवाजी नागरे (वय २५, रा. मालुंजे), ताहीर सुलतान शेख (वय २८, रा. डिग्रस) आणि अविनाश अनिल मिसाळ (वय २४, रा. घुलेवाडी) अशी आहेत. या सर्वांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास करत गौण खनिजाची चोरी केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

६० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त – पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर (क्र. MH-17-CV-4063), ४० लाख रुपये किमतीचे पिवळ्या रंगाचे जेसीबी मशीन (क्र. MH-15-JM-4010), १० लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ज्याचा नंबर खोडलेला होता, ५ हजार रुपये किमतीची लोखंडी फरांडी (केणी) व साखळी आणि टिप्परच्या हौद्यात असलेली १२ हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू असा एकूण ६० लाख १७ हजार रुपयांच्या मालाचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,464
कारवाई वाळू चोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.