Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकशाहीला गालबोट: आनंद विद्यालयात बनावट कार्डांचा साठा, दोन संशयित पोलिसांच्या जाळ्यात; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश
निवडणूक

लोकशाहीला गालबोट: आनंद विद्यालयात बनावट कार्डांचा साठा, दोन संशयित पोलिसांच्या जाळ्यात; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

चौकशीतून निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –

अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज बनावट ओळखपत्रांच्या एका मोठ्या प्रकरणाने गालबोट लागले. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्डांचा मोठा साठा बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विद्यालय केंद्रावर मतदान सुरू असताना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. काही उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सतर्कता दाखवत या व्यक्तींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्ड आढळून आली. एकाच व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ओळखपत्रे सापडल्याने उपस्थित उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आक्षेप नोंदवला. यामुळे केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक ३ चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित इसमांना तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले. सुधीर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, संबंधित व्यक्तींकडे बनावट कागदपत्रे आढळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या तोफखाना पोलीस ठाण्यात या दोन्ही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. ही बनावट ओळखपत्रे कोठून आणली, ती कोणासाठी तयार करण्यात आली होती आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. चौकशीतून निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

​निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी यावेळी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 835
निवडणूक ओळखपत्र बनावट मतदान कार्ड सुधीर पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण…

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.