Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकनेते बाळासाहेब थोरातांच्या संकल्पनेतील संगमनेरचा ‘हॅपी हायवे’: विकासाचा नवा ‘ट्रेडमार्क’ आणि फुलांचा मखमली साज!
सामाजिक

लोकनेते बाळासाहेब थोरातांच्या संकल्पनेतील संगमनेरचा ‘हॅपी हायवे’: विकासाचा नवा ‘ट्रेडमार्क’ आणि फुलांचा मखमली साज!

काही काळापूर्वी अनधिकृत फ्लेक्स आणि स्वच्छतेच्या अभावामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, संगमनेर सेवा समितीने ठाम भूमिका घेत संपूर्ण रस्ता फ्लेक्समुक्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि प्रवाशांच्या मनाला प्रसन्नता देणारा इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा ‘हॅपी हायवे’ सध्या विविधरंगी फुलांनी सजला आहे. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा ९ किलोमीटरचा चौपदरी रस्ता केवळ मजबूत बांधकामासाठीच नाही, तर उत्कृष्ट सौंदर्यीकरणासाठी राज्याचा ‘ट्रेडमार्क’ ठरला आहे.
​या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर गुलाबी, पिवळा, सफेद आणि लाल अशा विविधरंगी फुलांची आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील दाट वृक्षवल्लीमुळे संपूर्ण परिसराला निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा रस्ता प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर अनेक नामांकित महाविद्यालये असल्याने तरुणाईसाठी हा रस्ता आता एक प्रमुख ‘सेल्फी पॉईंट’ बनला आहे. कॉलेज रोड म्हणून परिचित असलेला हा मार्ग आता संगमनेरचा ‘लक्ष्मी रोड’ म्हणूनही नावारूपास आला आहे.
​काही काळापूर्वी अनधिकृत फ्लेक्स आणि स्वच्छतेच्या अभावामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, संगमनेर सेवा समितीने ठाम भूमिका घेत संपूर्ण रस्ता फ्लेक्समुक्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निकालांच्या पार्श्वभूमीवर, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना या रस्त्याची स्वच्छता आणि झाडांच्या संगोपनाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता नियमितपणे फुलांना पाणी मारणे आणि रस्त्याची निगा राखण्याचे काम जोमाने सुरू आहे.
☀️ ​लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अशोक सोनवणे म्हणाले की, सत्ता असो वा नसो, लोकनेते कायम जनतेच्या हितासाठी कार्यरत असतात. मागील वर्षभरात जेव्हा जेव्हा पाणी नसल्यामुळे ही झाडे कोमजली, तेव्हा थोरात यांनी स्वतः प्रशासनाला सूचना देऊन या रस्त्याचे वैभव टिकवून ठेवले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आज हा ‘हॅपी हायवे’ संगमनेरच्या विकासाची नवी ओळख बनला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 715
नाशिक पुणे महामार्ग बाळासाहेब थोरात हॅपी हायवे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.