Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धांदरफळ बुद्रुक येथे ‘स्वदेश कला उत्सवा’तून ग्रामविकासाचा जागर; विविध सामाजिक उपक्रमांनी सोहळ्याची सांगता
सामाजिक

धांदरफळ बुद्रुक येथे ‘स्वदेश कला उत्सवा’तून ग्रामविकासाचा जागर; विविध सामाजिक उपक्रमांनी सोहळ्याची सांगता

महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेवर आधारित स्वामीराज भिसे आणि रुचिका खोत यांचा 'वारी आडवाटांच्या विठोबाची कीर्तावणी' हा नाट्यप्रयोग सादर झाला, याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी या उदात्त उद्देशाने धांदरफळ बुद्रुक येथे आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ व ‘स्वदेश कला उत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या उत्सवाचे उद्घाटन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सांगता समारंभाप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, धांदरफळ बुद्रुक गावाने ग्रामविकासाची वेगळी दिशा दर्शविली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकोपयोगी उपक्रम राबवून या गावाने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानच्या विकासासोबतच बाळासाहेब देशमाने आणि ग्रामपंचायतीने ग्रामविकासाचा जो आदर्श ठेवला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

उत्सवादरम्यान राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांची जयंती साजरी करण्यात आली. केवळ मनोरंजन न करता ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण आणि शेतकरी पुत्रांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या ‘नवरदेव’ या चित्रपटाचे प्रदर्शन करून सामाजिक जनजागृती करण्यात आली. स्वदेश महिला मंचाच्या वतीने आयोजित ‘उत्सव स्त्री शक्तीचा’ अंतर्गत ‘लय भारी संगमनेरी होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. यामध्ये महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा करंडा, ओव्हन आणि गॅस शेगडी यांसारखी भरघोस बक्षिसे देण्यात आली. गप्पा, उखाणे आणि खेळांच्या माध्यमातून महिलांना विरंगुळा व विचारांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

सुशिक्षित बेरोजगार आणि बचत गटांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन चर्चासत्राचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बँकांमार्फत कर्ज वितरण आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले, ज्यामुळे ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेवर आधारित स्वामीराज भिसे आणि रुचिका खोत यांचा ‘वारी आडवाटांच्या विठोबाची कीर्तावणी’ हा नाट्यप्रयोग सादर झाला, याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासोबतच गप्पागोष्टी, गाणे, खेळ, नृत्य आणि उखाणे यांसह विचारांचे तिळगुळ देऊन हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.

गावातील भूमिपुत्रांच्या कलागुणांचा सन्मान करण्यासाठी ‘स्वदेश कला गौरव सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. यामध्ये उद्धव चंद्रभान गोर्डे यांना कृषी, दुग्ध व्यवसाय व आदर्श कुटुंब, संपत वाकचौरे यांना पारंपारिक लाकडी कला आणि बाळासाहेब भाऊराव देशमुख (टेलर बाबा) यांना ६० वर्षांपासूनच्या पारंपारिक शिवणकलेसाठी (धोतर शिवणकाम) गौरवण्यात आले. ग्रामविकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच उज्वलाताई देशमाने व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्याला शाबासकी देण्याकरिता मकर संक्रांतीच्या दिवशी हा सोहळा रंगला.

या सोहळ्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कांचनताई थोरात, पांडुरंग घुले, रामहरी कातोरे, बाळासाहेब देशमुख, अनिल देशमुख, खंडू सातपुते, सतीश खताळ, अरुण वाकचौरे, डॉ. जयश्रीताई थोरात, लताताई कातोरे, उज्वला देशमाने, संगीता देशमाने, सुनीता कोडे, सुरभी पवार, गोकुळ राहणे, वंदना राहणे, उद्योजक कोमल उगले, सारिका परदेशी, प्रिया म्हस्के, विविध बचत गटातील महिला मंडळ, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त मंडळ, युवा प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार, ग्रामपंचायत सदस्य मंडळ, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक, धांदरफळ पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, हरिभक्त परायण स्वामीराज भिसे, रुचिका खोत आणि पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनाथ देशमाने यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 689
स्वदेश महोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.