Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये अमेरिकेच्या डॉक्टरांकडून मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात १५० रुग्णांची तपासणी; ४७ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

संगमनेरमध्ये अमेरिकेच्या डॉक्टरांकडून मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात १५० रुग्णांची तपासणी; ४७ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया

अमेरिकेचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. लेरी वेनस्टन, डॉ. व्हिटने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेहून संगमनेरमध्ये येऊन या शस्त्रक्रिया केल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी- 
डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील सुमारे १५० रुग्णांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ अत्यंत गरजवंत रुग्णांवर विविध प्रकारच्या प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली.
हे शिबीर दि. ११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पार पडले. गेल्या २६ वर्षांपासून लायन्स क्लब सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करत आहे. शारीरिक व्यंगामुळे, विशेषतः फाटलेले ओठ, टाळूवरील छिद्रे, तिरळेपणा, चेहऱ्यावरील डाग, गाठी आणि हाता-पायांच्या जन्मजात दोषांमुळे अनेक व्यक्ती न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने समाजात वावरता यावे, त्यांच्या लग्नातील किंवा नोकरीतील अडथळे दूर व्हावेत, या उद्देशाने अमेरिकेचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. लेरी वेनस्टन, डॉ. व्हिटने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेहून संगमनेरमध्ये येऊन या शस्त्रक्रिया केल्या.
दोन दिवसांच्या या मोहिमेत दुभंगलेले ओठ, वाकडे नाक व कान, कानामागील मोठे गळू, गालावरील गाठी आणि चिकटलेली बोटे अशा ४७ क्लिष्ट शस्त्रक्रिया विनामूल्य पूर्ण करण्यात आल्या. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. लेरी वेनस्टन यांनी लायन्स क्लबच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले, तर डॉ. प्रविणकुमार पानसरे यांनी या कार्याला ‘संतांचे कार्य’ अशी उपमा देत सहकार्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या शिबिराला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, महेश मयूर, मधुसूदन नावंदर, आशिष बुब, एकनाथराव पानसरे आदी मान्यवरांनी भेट देऊन शिबीरार्थींची विचारपूस केली. रामनारायण बुब मेमोरियल ट्रस्टच्या आर्थिक सहकार्यासोबतच संग्राम नागरी सहकारी पतसंस्था, मालपाणी उद्योग समूह, संगमनेर मर्चंट्स बँक, अमृतवाहिनी सहकारी बँक, विजय नागरी बँक, शारदा नागरी बँक आणि ओम मयूर ज्वेलर्स यांनी या उपक्रमाला मोलाचा हातभार लावला.
क्लबचे अध्यक्ष संजय आसावा आणि सह-प्रकल्प प्रमुख चेतन कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिकेत कासार, डॉ. रसिका वाघोलीकर, डॉ. दातीर, डॉ. विनीत सुखटनकर यांनी भूलतज्ज्ञ म्हणून तर डॉ. हासे यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुचित गांधी, राणीप्रसाद मुंदडा, चेतन कर्डिले, श्रीनिवास पगडाल, प्रकाश कलंत्री, अमोल खटाटे, डॉ. अभय चोरडिया, बबीता आसावा, केदार राठी, योगेश कोळपकर, वैभव शहा, विलास क्षत्रीय, बापूसा टाक, राजाभाऊ सोमाणी यांच्यासह धन्वंतरी हॉस्पिटल व उमागौरी वुमेन्स फाऊंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 708
प्लास्टिक शस्त्रक्रिया लायन्स क्लब ऑफ संगमनेर सुचित गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट…

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.