Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घारगावमध्ये धाडसी घरफोडी: बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल लंपास
गुन्हेगारी

घारगावमध्ये धाडसी घरफोडी: बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल लंपास

आपले राहते घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

घारगाव, प्रतिनिधी – 

संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १ लाख ४० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अप्सरा मोहम्मद शेख (वय ५९, रा. घारगाव) या ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून आपले राहते घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली आणि लाकडी कपाटाचे ड्रॉवर फोडून त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला.

या घरफोडीमध्ये चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि ५० हजार रुपये किमतीचे १ तोळा वजनाचे सोन्याचे काळे मणी असलेले मिनी गंठण असा एकूण ७५ हजार रुपयांचे दागिने चोरले. तसेच, कपाटात ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

१७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी घरी परतल्या असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 669
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.