Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या सफायर एक्स्पोत ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चा बोलबाला; आर्थिक साक्षरतेसाठी नागरिकांची गर्दी!
आर्थिक

संगमनेरच्या सफायर एक्स्पोत ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चा बोलबाला; आर्थिक साक्षरतेसाठी नागरिकांची गर्दी!

एक्स्पोमधील स्टॉलवर येणाऱ्या नागरिकांना एकरकमी गुंतवणूक, एसआयपी, टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा आणि मानवी जीवनाचे आर्थिक मूल्य या विषयांवर सविस्तर माहिती दिली जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

शहरातील मालपाणी लॉन्स येथे सध्या ‘सफायर बिझनेस एक्स्पो’चा उत्साह शिगेला पोहोचला असून, या प्रदर्शनात कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलने संगमनेरकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘एसआयपीची सवय भारी, जीवनात येईल संपत्ती न्यारी’ आणि ‘एफडी की स्वॅप? काय आहे फायद्याचं? उत्तर आहे फक्त स्वॅपच्या दुहेरी नफ्याचं!’ या दोन प्रभावी संदेशांमुळे गुंतवणुकीबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. १५ ते २२ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये मनोरंजनासोबतच आपल्या आर्थिक भविष्याची तरतूद करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने स्टॉल क्रमांक १० ला भेट देत आहेत.

आजच्या काळात वाढती महागाई आणि बँक मुदत ठेवींचे (FD) घटते व्याजदर यामुळे सामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहे. त्यातच जिल्हाभरात पतसंस्थांबाबत निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी आता म्युच्युअल फंडासारख्या अधिक परतावा देणाऱ्या पर्यायांकडे आपला मोर्चा वळवला आहे. कडलग इन्व्हेस्टमेंटने गेल्या २९ वर्षांपासून ग्राहक हित, पारदर्शकता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर आपली परंपरा जपली आहे. मुलांचे उच्च शिक्षण, मुलीचे लग्न, स्वतःचे घर किंवा निवृत्तीनंतरचे पेन्शन यांसारख्या विविध उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण कशी करावी, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन येथे केले जात आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ हा विश्वास सार्थ ठरवत ही संस्था आज २०० कोटींहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत आहे.

संस्थेचे संस्थापक सुनील कडलग यांनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने आणि वृत्तपत्रांतील लिखाणातून आर्थिक साक्षरतेची चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे त्यांना ‘इंडियन ग्लोरी अवॉर्ड’ या राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. सुनील कडलग यांचे ‘चला अर्थ साक्षर होऊयात’ हे ब्रीदवाक्य आज घराघरांत पोहोचले आहे.

कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी देखील आता नव्या दमाने आणि आधुनिक विचाराने या क्षेत्रात कार्यरत झाली आहे. आदित्य सुनील कडलग यांना टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचा अत्यंत मानाचा ‘डबल एमडीआरटी २०२६’ हा अवॉर्ड जाहीर झाला आहे. या यशामुळे त्यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २३ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या ‘एमडीआरटी’ जागतिक परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. ही संगमनेरकरांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

एक्स्पोमधील स्टॉलवर येणाऱ्या नागरिकांना एकरकमी गुंतवणूक, एसआयपी, टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा आणि मानवी जीवनाचे आर्थिक मूल्य या विषयांवर सविस्तर माहिती दिली जात आहे. अनेकांनी भविष्यकालीन नियोजनासाठी स्टॉलवरील क्यू आर कोड स्कॅन करून आपली नाव नोंदणी केली आहे. नागरिकांनी एक्स्पो संपल्यानंतरही ‘टॉप टेन’ इमारतीमधील कार्यालयास भेट देऊन आपल्या संपत्ती निर्मितीचा मार्ग सुकर करावा, असे आवाहन व्यवस्थापक शुभम सोमवंशी आणि उपव्यवस्थापक सुरज म्हस्के यांनी केले आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी अर्चना सरोदे, स्वाती सरमाडे, मानसी घटे, प्रियंका पाटील आणि मयुरी देशमुख हे विशेष परिश्रम घेत असून नागरिकांनी आपली वेळ नोंदवून आर्थिक चर्चा करावी, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,017
कडलग इन्व्हेस्टमेंट बिझनेस एक्स्पो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

01/08/2026

आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

29/06/2026

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड

24/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.