Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एलसीबीची दमदार कामगिरी; दरोड्याचा छडा लावत १२ गुन्हे उघड, मुख्य आरोपी कोठेवाडी प्रकरणातील गुन्हेगार
गुन्हेगारी

एलसीबीची दमदार कामगिरी; दरोड्याचा छडा लावत १२ गुन्हे उघड, मुख्य आरोपी कोठेवाडी प्रकरणातील गुन्हेगार

पकडण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अज्ञान उर्फ राजू उर्फ सक्या वकील्या भोसले हा आरोपी कोठेवाडी खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
अहिल्यानगर: शेवगाव तालुक्यातील ढाकणेवस्ती येथे चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या धाडसी दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या दोन दिवसांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह चार जणांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण कोठेवाडी येथील गाजलेल्या खून प्रकरणातील शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आहे.
​१५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शेवगाव येथील ढाकणेवस्तीत राहणाऱ्या विमल बबन ढाकणे यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी हल्ला केला होता. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस. २०२३ च्या कलम ३०९ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.
​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा रोहित नादर चव्हाण याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हे बाराबाभळी ते चांदबीबी महाल परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला.
संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या पाच जणांपैकी पोलिसांनी पाठलाग करून रोहित नादर चव्हाण (वय २६ वर्षे रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगर, बंटी टाबर चव्हाण (वय २७ वर्षे रा. म्हरोळा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर), करण शिरसाठ भोसले (वय २२ वर्षे रा. पिंपळवाडी, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या (वय ५० वर्षे रा. पिंपळवाडी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांना पकडले तर विशाल टाबर चव्हाण (रा. म्हरोळा ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
​पकडण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अज्ञान उर्फ राजू उर्फ सक्या वकील्या भोसले हा आरोपी कोठेवाडी खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी टोळी तयार करून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात चोरी व दरोड्याचे सत्र सुरू केले होते.
​पोलिसांनी आरोपींकडून ७ लाख २ हजार रुपये किमतीचे ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड, एक लाख रुपये किमतीची मोटार सायकल आणि गुन्ह्यात वापरलेली लोखंडी हत्यारे असा एकूण ८ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे शेवगावसह जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे अधिकारी व अंमलदार दीपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे आणि पथकाने केली आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 383
अहिल्यानगर एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.