Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पठार भागात गुन्हेगारांचे ‘राज्य’; पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा फटका, एकाच रात्री सहा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या केबल लंपास
गुन्हेगारी

पठार भागात गुन्हेगारांचे ‘राज्य’; पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा फटका, एकाच रात्री सहा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या केबल लंपास

धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी घारगाव पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी-अकलापूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तब्बल सहा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंपांच्या केबल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी घारगाव पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
​या संदर्भात दीपक प्रताप भोर (वय ४८, रा. शेळकेवाडी अकलापूर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गट नंबर २३ मधील विहिरीवर सहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी पानबुडी इलेक्ट्रिक मोटार बसवली होती. गुरुवारी १५ तारखेला त्यांनी मोटार चालवून संध्याकाळी बंद केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोटार चालू करण्यासाठी गेले असता विहिरीतून पाणी आले नाही. त्यांनी अधिक तपासणी केली असता, मोटारीच्या खोक्यापासून ते मोटारीपर्यंतची सुमारे ३०० फूट लांबीची पॉलीकेअर कंपनीची केबल कोणीतरी कापून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसराची पाहणी केली असता, चोरट्यांनी काही अंतरावर नेऊन केबलमधील तांबे काढून घेतले होते.
​या घटनेची माहिती गावात पसरताच इतर शेतकऱ्यांनीही आपापल्या विहिरींची तपासणी केली. यामध्ये दीपक भोर यांच्यासह राम विठोबा गवांदे यांची २०० फूट, रवींद्र विजय गुंजाळ यांची १०० फूट, भाऊसाहेब दगडू तळपे यांची २०० फूट, गोरक्षनाथ बबन कडाळे यांची १३० फूट, उत्तम धोंडीबा निमसे यांची ८० फूट आणि संतोष दशरथ निमसे यांची ५० फूट अशा एकूण १ हजार ६० फूट लांबीच्या पॉलीकेअर कंपनीच्या केबल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या सर्व केबलची किंमत सुमारे १७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
​संगमनेरच्या पठार भागात गेल्या काही दिवसांपासून केबल चोरी, हाणामारी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 273
केबल चोरी गुन्हेगारी घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.