Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बहुमताच्या महासागरात ‘ती’ ठरली वरचढ; सत्ताधाऱ्यांची कसरत, पण ‘त्या’ एकमेव नगरसेविकेने पालिकेच्या तब्बल अर्धा डझन समित्यांवर मारली बाजी!
निवडणूक

बहुमताच्या महासागरात ‘ती’ ठरली वरचढ; सत्ताधाऱ्यांची कसरत, पण ‘त्या’ एकमेव नगरसेविकेने पालिकेच्या तब्बल अर्धा डझन समित्यांवर मारली बाजी!

तांत्रिक कारणास्तव त्यांना महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर स्थान मिळू शकले नसले, तरी पालिकेच्या इतर सर्व विभागांच्या कामकाजात त्यांचा आता थेट सहभाग राहणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर | अनंत पांगारकर – 
संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी काल (सोमवारी) पार पडल्या असून, यामध्ये एका महिला नगरसेविकेची कामगिरी सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांना देखील ज्या समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तिथे विरोधी पक्षाच्या एकमेव महिला नगरसेविकेने सर्वच समित्यांवर आपले स्थान निश्चित करून एक नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. संगमनेर पालिकेत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील सेवा समितीचे २७ नगरसेवकांसह एकहाती वर्चस्व असून दोन अपक्ष नगरसेवकांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. मात्र, या प्रचंड बहुमताच्या गर्दीतही विरोधी बाकावर बसणाऱ्या शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी सर्वसमावेशक संधी मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विशेष म्हणजे, सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांना जास्तीत जास्त दोन समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. अर्धा डझन समित्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सत्ताधारी गटात मोठी चढाओढ आणि रस्सीखेच पाहायला मिळत असताना, विरोधी पक्षाच्या साक्षी सूर्यवंशी यांची मात्र महिला व बालकल्याण, शिक्षण-क्रीडा व सांस्कृतिक कार्य, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, तसेच नियोजन आणि विकास अशा सर्व सहा महत्त्वाच्या समित्यांवर सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
नगरपालिकेच्या इतिहासात एकाच वेळी सर्वच विषय समित्यांवर सदस्य म्हणून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला सदस्य ठरल्या आहेत. जरी तांत्रिक कारणास्तव त्यांना महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर स्थान मिळू शकले नसले, तरी पालिकेच्या इतर सर्व विभागांच्या कामकाजात त्यांचा आता थेट सहभाग राहणार आहे. बहुमताच्या महासागरात ‘ती’ वरचढ ठरल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
सत्ताधारी नगरसेवकांपेक्षाही अधिक समित्यांवर काम करण्याची संधी या एकमेव महिला लोकप्रतिनिधीला मिळाल्याने, आगामी काळात पालिकेच्या सभागृहात त्यांचा वावर आणि प्रशासनावर असणारा प्रभाव निश्चितच लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका बाजूला सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ आणि दुसऱ्या बाजूला एकट्या साक्षी सूर्यवंशी यांचा सहा समित्यांमधील दबदबा, असा सामना आता संगमनेर पालिकेत पाहायला मिळणार आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,749
धीरज मांजरे विषय समित्या निवडणूक शिवसेना शिंदे गट संगमनेर सेवा समिती साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.