Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिबलापूर ग्रामपंचायतीचा झुकला कणा; महापुरुषांच्या अवमानप्रकरणी लेखी माफी, संजय मंतोडेंचा लढा यशस्वी! ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
आंदोलन

शिबलापूर ग्रामपंचायतीचा झुकला कणा; महापुरुषांच्या अवमानप्रकरणी लेखी माफी, संजय मंतोडेंचा लढा यशस्वी! ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

ग्रामपंचायतीने लेखी माफी मागितल्यानंतर आणि भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर, संजय मंतोडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन आपले उपोषण मागे घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या प्रतिमा गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर, याविरोधात कायदेशीर लढा देणारे तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. सुरुवातीला तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखी माफीनामा सादर करत आपली चूक मान्य केली आहे. या निर्णयामुळे सत्य समोर आले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड होत असल्याची तक्रार संजय मंतोडे यांनी प्रशासनाकडे केली होती. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती.

मात्र, ही बातमी समोर आल्यावर संबंधित अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांनी आपली चूक सुधारण्याऐवजी तक्रारदारालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काहींनी पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन ‘काहीच घडले नाही’ असे भासवण्यासाठी फोटो सेशन केले होते. जुने फोटो केवळ सुरक्षित ठेवल्याचा दावा करत तक्रारदाराला खोटे ठरवण्याचा घाट घातला गेला होता.

मात्र, संजय मंतोडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे उपोषणाचा इशारा दिला होता. तक्रारदाराकडे असलेले ठोस पुरावे आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने माघार घेतली. सरपंच, ग्रामसेवक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी मंतोडे यांची भेट घेऊन लेखी माफीनामा सुपूर्द केला. या पत्रात प्रशासनाने स्पष्टपणे नमूद केले की, संबंधित प्रकार अनावधानाने घडला असून त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही आणि तक्रारदाराने सुचवलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी ग्वाही देखील देण्यात आली.

ग्रामपंचायतीने लेखी माफी मागितल्यानंतर आणि भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर, संजय मंतोडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन आपले उपोषण मागे घेतले. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने दिलेली बातमी ही पूर्णपणे सत्यावर आधारित होती, हे आता या लेखी माफीनाम्यामुळे सिद्ध झाले असून सत्याचा विजय झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 362
शिबलापूर ग्रामपंचायत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.