Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रक्षक की भक्षक? पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे अहिल्यानगर पोलीस दलात; एलसीबीचा कर्मचारी ताब्यात!
गुन्हेगारी

रक्षक की भक्षक? पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे अहिल्यानगर पोलीस दलात; एलसीबीचा कर्मचारी ताब्यात!

आरोपी शादाब शेख याची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. या तस्करीच्या रॅकेटमध्ये अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याचा थेट सहभाग असल्याचे समोर आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2026Updated:21/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे/अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी 

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. २ कोटी १० लाख रुपयांचे ‘मेफेड्रोन’ (MD) ड्रग्ज जप्त केल्यानंतर, या काळ्या धंद्याचे धागेदोरे चक्क अहिल्यानगर पोलीस दलातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी श्याम गुजर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून, खाकी वर्दीला लागलेल्या या डागामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात होती. १७ जानेवारी रोजी शिरूर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना ड्रग्ज विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार १८ जानेवारीच्या मध्यरात्री बाबुरावनगर परिसरातील एका मोकळ्या मैदानात छापा टाकला असता, शादाब रियाज शेख (वय ४१) या गॅरेज चालकाला रंगेहात पकडण्यात आले.

त्याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम मेफेड्रोन (MD) आणि एक दुचाकी, असा एकूण २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसाचे नाव येताच यंत्रणा हादरली! – अटक केलेला आरोपी शादाब शेख याची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. या तस्करीच्या रॅकेटमध्ये अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत असलेला कर्मचारी श्याम गुजर याचा थेट सहभाग असल्याचे समोर आले. पुणे ग्रामीण एलसीबीने मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी गुजरला ताब्यात घेतले. ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसाचाच हात असल्याने ‘रक्षकच भक्षक’ बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पोलीस दलाची विश्वासार्हता ऐरणीवर – काही दिवसांपूर्वीच नगर पोलीस दल ‘मल्टीस्टेट’ आर्थिक घोटाळ्यातील लाचखोरी, अवैध धंद्याच्या कोट्यावधीच्या हप्ते खोरीच्या आरोपामुळे व खासदार निलेश लंके यांच्या उपोषणामुळे चर्चेत आले होते. आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसाचा सहभाग आढळल्याने नागरिकांमधून संतप्त सवाल विचारले जात आहेत. तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या या विषारी विळख्यात जर पोलीसच सामील असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

तपासाची चक्रे फिरली! – संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे आरोपीशी असलेले आर्थिक व्यवहार, ड्रग्ज नेटवर्कमधील त्याची नेमकी भूमिका आणि या साखळीत आणखी कोणा बड्या अधिकाऱ्याचे वरदहस्त आहेत का? याचा सखोल तपास पुणे एलसीबी करत आहे.

https://www.lokshahi.com/lokshahi-politics/maharashtra/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/police-officer-named-shyam-gujar-arrested-in-drug-case-in-shirur-area

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 910
अहिल्यानगर एलसीबी ड्रग्स पुणे एलसीबी पोलीस दलाला काळीमा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.