Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १०७ वर्षांच्या ऐतिहासिक वास्तूला मिळालं ‘नवं रूप’; राजापुरात ‘अग्निझुंज’ने केली कमाल! राहुल गांधी समर्थक संघाचा पुढाकार
सामाजिक

१०७ वर्षांच्या ऐतिहासिक वास्तूला मिळालं ‘नवं रूप’; राजापुरात ‘अग्निझुंज’ने केली कमाल! राहुल गांधी समर्थक संघाचा पुढाकार

जिल्हा परिषद केंद्र शाळेत राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळात १०७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी वास्तू कारखान्याच्या ‘अग्निझुंज’ या अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या विधायक उपक्रमामुळे शाळेने आता कात टाकली असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेत राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
राजापूर येथील ही जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील धूळ, पटांगणातील पालापाचोळा आणि जुन्या इमारतीवर साचलेली धूळ यामुळे शाळेचे सौंदर्य काहीसे झाकोळले गेले होते. ही बाब लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या प्रश्नी राहुल गांधी समर्थक संघाच्या टीमशी संपर्क साधला.
यावर तात्काळ प्रतिसाद देत संघाचे समन्वयक अमोल शेलकर व राम अरगडे यांनी थोरात साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन पांडुरंग घुले, विद्यमान संचालक संतोष हासे आणि लताताई गायकर यांच्याकडे मदतीची विनंती केली.
या विनंतीचा आदर करत कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतेसाठी कारखान्याचा ‘अग्निझुंज’ हा बंब उपलब्ध करून दिला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा जोरदार मारा करून शाळेची भिंत, छप्पर आणि परिसर लिलया स्वच्छ केला. बऱ्याच वर्षांनंतर अशा पद्धतीने शाळेची स्वच्छता झाल्याचे पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राधाबाई आरोटे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी राहुल गांधी समर्थक संघ आणि कारखाना प्रशासनाचे पुष्पगुच्छ देऊन विशेष आभार मानले.
या आगळ्यावेगळ्या स्वच्छता मोहिमेप्रसंगी राजापूर गावच्या सरपंच कुसुमताई पानसरे, ग्रामसेवक भाऊसाहेब भांड, उपक्रमशील शिक्षक वृंद, तसेच राहुल गांधी समर्थक संघाचे समन्वयक अरुण चव्हाण, अमोल शेलकर, राम अरगडे आणि इतर सक्रिय सदस्य उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 516
RGSS थोरात सहकारी साखर कारखाना राजापूर जिल्हा परिषद शाळा राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.