अहिल्यानगर –
श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.
हिंगणी येथील मंदिरात चोरी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे ही चोरी सराईत गुन्हेगार भास्कर पथवे याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या राहत्या परिसरात सलग चार दिवस शोध घेतला, मात्र आरोपी बाहेरगावी असल्याने ते सापडले नाहीत. दरम्यान, आरोपी एका चारचाकी वाहनातून संगमनेरहून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी भास्कर खिमा पथवे (वय ५० वर्षे) आणि राजेंद्र ठकाजी उघडे (वय ३३ वर्षे, दोघेही राहणार नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) यांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या चोरीत त्यांचा तिसरा साथीदार संजय भास्कर गावडे याचाही सहभाग असल्याचे समोर आले असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५ लाख १० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, ५ लाख रुपयांची तवेरा गाडी (क्रमांक MH 04 CM 6712), ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन, ८ हजार ४०० रुपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे असा एकूण १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून टोळीचा म्होरक्या भास्कर पथवे याच्यावर अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. तसेच या टोळीवर बेलवंडी, पारनेर, राजूर, आश्वी आणि नेवासे पोलीस ठाण्यांतही गुन्हे नोंद आहेत. पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फूरखान शेख, दीपक घाटकर, भीमराज खर्से, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित अमोल, आकाश काळे, योगेश कर्डिले आणि अरुण मोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
एलसीबीची मोठी कारवाई; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दागिने चोरणारी टोळी संगमनेरची,….
पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून टोळीचा म्होरक्या भास्कर पथवे याच्यावर अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत.