Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साकूर ग्रामपंचायतीच्या ‘नक्षत्र घनवना’चा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव; पुन्हा भेटीला येईल, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला शब्द
प्रशासन

साकूर ग्रामपंचायतीच्या ‘नक्षत्र घनवना’चा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव; पुन्हा भेटीला येईल, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला शब्द

याच दौऱ्यादरम्यान डॉ. आशिया यांनी परिसरात असलेल्या बिबट्यांच्या परिस्थितीबाबतही सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

साकूरमधील नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि ग्रामपंचायतीचे नेटके नियोजन पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः भारावून गेले होते. यावेळी त्यांनी साकूर ग्रामपंचायतीच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले आणि साकूरला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी नक्की येईल, असा शब्दही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांना दिला.

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने केलेल्या लोकाभिमुख कामांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) प्रत्यक्ष पाहणी केली. 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साकूर शिवारातील खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या नक्षत्र घनवन उद्यान व तुलसी वृंदावनाची बारकाईने पाहणी केली. विशेषतः महर्षि पराषर व महर्षी वराहमिहीर यांच्या ‘गुल्म वृक्षा आयुर्वेद’ ग्रंथावर आधारित नक्षत्र घनवन वृक्ष लागवड येथे करण्यात आली आहे. या वृंदावनात ४४ प्रकारच्या विविध जातींची २ हजार ९६० झाडे लावण्यात आली असून, ही माहिती कृषी विस्तार अधिकारी अजितदानंद पावसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. 

हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी दगड, चुना, माती व गवतापासून बनविलेल्या पारंपरिक वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली.

गावातील कचरा व्यवस्थापन आणि पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. तसेच ‘द कारर्गल’ ग्रंथाच्या आधारावर पाणी टंचाई मुक्त गाव करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती उपसरपंच शंकरराव खेमनर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. याच दौऱ्यादरम्यान डॉ. आशिया यांनी परिसरात असलेल्या बिबट्यांच्या परिस्थितीबाबतही सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली.

प्रशासकीय कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी थेट शेतकरी देऊबाई नामदेव कांबळे यांच्या शेतात जाऊन ई-पीक पाहणीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना सूचना देऊन जागेवरच या शेतकऱ्याची पीक पाहणी पूर्ण करून घेतली. त्यानंतर साकूरमधील स्मशानभूमीच्या जागेची पाहणी करून त्याचा अधिकृत उतारा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, तहसीलदार धीरज मांजरे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, सरपंच सचिन सोनवणे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, विस्तार अधिकारी काशिनाथ सरोदे, कृषी विस्तार अधिकारी अजितदानंद पावसे, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, ग्राममहसूल अधिकारी सोमनाथ शेरमाळे, कैलास डोखे, रमेश पेंडभाजे, किशोर खेमनर, इसाक पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 538
जिल्हाधिकारी पंकज आशिया साकुर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.