संगमनेर, प्रतिनिधी –
तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (वय ७२, रा. ठाणे पच्छिम, मूळ रा. कोल्हेवाडी, संगमनेर) यांचे कोल्हेवाडी येथे घर आहे. दि. १३ जानेवारी ते दि. १८ जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली. कोल्हे कुटुंबीय घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराभोवतीच्या तार कंपाउंडची तार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घराच्या बाजूच्या पोर्चमधील खिडकीचे गज कशाच्या तरी साहाय्याने तोडून व वाकवून खिडकीवाटे घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्याने दक्षिण बाजूच्या बेडरूमच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश मिळवला. बेडरूममधील गोदरेज कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील ॲल्युमिनियमच्या पेटीचे लॉक तोडण्यात आले. या पेटीतून चोरट्याने प्रत्येकी १० ग्रॅम वजनाची ३० हजार रुपये किमतीची दोन सोन्याची नाणी, १० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि ५ हजार रुपये रोख असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
फिर्यादी दत्तात्रय कोल्हे हे सध्या ठाणे येथे वास्तव्यास असून, डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्याने त्यांना तक्रार देण्यास विलंब झाला. त्यांनी २१ जानेवारी रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बंद घर फोडून ७५ हजारांचा ऐवज लंपास; खिडकीचे गज तोडून चोरट्यांचा शिरकाव
पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



संगमनेर, प्रतिनिधी –
फिर्यादी दत्तात्रय कोल्हे हे सध्या ठाणे येथे वास्तव्यास असून, डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्याने त्यांना तक्रार देण्यास विलंब झाला. त्यांनी २१ जानेवारी रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली.

