Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थ तस्करीतील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या! संगमनेर पोलिसांची भारतनगर ते नाशिक ‘फिल्मी स्टाईल’ धाड, ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांची वक्रदृष्टी
गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थ तस्करीतील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या! संगमनेर पोलिसांची भारतनगर ते नाशिक ‘फिल्मी स्टाईल’ धाड, ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांची वक्रदृष्टी

प्राथमिक चौकशीनंतर या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने नाशिक येथे धाड टाकली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ व अंमली द्रव्य कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी साद शेख हा सध्या संगमनेर येथील भारतनगर भागात असल्याची खात्री झाली. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने भारतनगर परिसरात सापळा रचला आणि मोहम्मद साद खालीद शेख (वय २४ वर्ष, रा. भारतनगर, संगमनेर) याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीनंतर या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने नाशिक येथे धाड टाकली. तेथून रेहान शेरखान पठाण (वय १९ वर्ष, रा. वडाळा, नाशिक) या दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी शिताफीने अटक केली. 

या दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०२७/२०२५ अन्वये अमली औषधद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८ व २२ नुसार गुन्हा दाखल असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण तसेच पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,270
ड्रग्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.