Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई; इंदिरानगर परिसरातून घातक शस्त्र जप्त
गुन्हेगारी

विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई; इंदिरानगर परिसरातून घातक शस्त्र जप्त

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ च्या कलम ३७(१)(अ) सह १३५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२६ नुसार नोंदवण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. इंदिरानगर मैदान परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी) रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील इंदिरानगर मैदानात आरोपी पप्पू ऊर्फ आकाश अर्जुन गोडगे हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५०० रुपये किमतीची ३ फूट लांबीची ॲल्युमिनियमची बेसबॉल स्टिक आणि १,००० रुपये किमतीचा ९ इंच लांबीचा लोखंडी बटनाचा चाकू मिळून आला.

जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांनी १३ जानेवारी २०२६ रोजी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रात शांतता व सुरक्षिततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ च्या कलम ३७(१)(अ) सह १३५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२६ नुसार नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई संगमनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आणि पोलीस उपनिरीक्षक बाळू घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,818
कारवाई जिल्हाधिकारी आदेशाचा भंग शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.