Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३३ लाखांच्या मुद्देमालासह ६ हजार किलो गोमांस जप्त, पाच जणांसह १० साथीदारांवर गुन्हे
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३३ लाखांच्या मुद्देमालासह ६ हजार किलो गोमांस जप्त, पाच जणांसह १० साथीदारांवर गुन्हे

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित २०१५ चे कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाच्या मदतीने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ६ हजार किलो गोमांस, जिवंत जनावरे आणि दोन पिकअप वाहनांचा समावेश आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, संगमनेरमधील जुना जोर्वे रोडवरील जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या न्यू सेवा सॉ मिलच्या समोरील एका वाड्यामध्ये काही इसम गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून मांस विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. 

या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस हवालदार गणेश लोंढे, विजय पवार, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकातील पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकण्याचे नियोजन केले. 

कारवाईसाठी दोन पंचांना सोबत घेण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी सदर वाड्यावर छापा टाकला असता, काही इसम जनावरांची कत्तल करत असल्याचे आणि काही जण मांसाचे तुकडे पिकअप वाहनात भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत वाड्याच्या मागील दरवाजातून पळ काढला. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे अंदाजे १ लाख रुपये किमतीचे ३००० किलो गोमांस वाड्यात साठवलेले आढळले.

तसेच बाहेर उभ्या असलेल्या दोन पिकअप वाहनांची (क्रमांक MH-15-FV-0027 आणि MH-48-CQ-7915) झडती घेतली असता, प्रत्येकी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण ३००० किलो गोमांस मिळून आले. याव्यतिरिक्त वाड्यामध्ये ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ६ गायी, २ बैल आणि १ कालवड अशी ९ जनावरे चारा-पाण्याशिवाय निर्दयीपणे डांबून ठेवलेली आढळली.

या प्रकरणी पोलिसांनी मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी, वाहीद अब्दुल करीम कुरेशी आणि अक्रम अहमद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर), पिकअप वाहन मालक शहबाज गुलाम हुसेन शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) आणि आदित्य राजेंद्र जाधव (रा. गोखिवरे, वसई पूर्व, पालघर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पाच मुख्य आरोपींसोबतच त्यांचे इतर ८ ते १० साथीदार देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या हे सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या कारवाईत ६ लाख रुपये किमतीच्या दोन महिंद्रा पिकअप गाड्या आणि कत्तलीसाठी वापरलेली १००० रुपये किमतीची दोन सुरी व एक कुऱ्हाड असा एकूण ३३ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित २०१५ चे कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आणि फरार झालेल्या आरोपींचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 838
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाना कारवाई गोमांस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.