Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई: शिर्डीत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीवर ‘बीएनएस’ कलम १११ अंतर्गत संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल; आरोपींचा जामीन वर्षभरासाठी लांबणीवर, होऊ शकते जन्मठेप!
गुन्हेगारी

जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई: शिर्डीत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीवर ‘बीएनएस’ कलम १११ अंतर्गत संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल; आरोपींचा जामीन वर्षभरासाठी लांबणीवर, होऊ शकते जन्मठेप!

कायदेतज्ज्ञांच्या मते, जर हे कलम लावले नसते, तर आरोपींना साधारणतः ८ ते १० दिवसांत जामीन मिळून ते पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय झाले असते. मात्र, आता कलम १११ मुळे ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत असू शकते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर – 
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ लावण्यात आले आहे. वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारचे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. “पिटा” कायद्यासोबतच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लावून पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, आता संघटितपणे अशा अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची गय केली जाणार नाही. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिर्डी पोलिसांनी हॉटेल साई सहारावर छापा टाकला होता. या कारवाईत अमोल भिमा भोसले (वय २४, रा. श्रीराम नगर, शिर्डी) आणि गणेश सिताराम कानडे (वय ४१, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) या दोन मुख्य आरोपींसह तीन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्यावर ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपी अमोल भोसले आणि गणेश कानडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच अनैतिक मानवी व्यापाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अमोल भोसलेवर यापूर्वी दोन, तर गणेश कानडेवर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. नवीन कायद्यानुसार, जर दोन किंवा अधिक व्यक्तींनी मिळून आर्थिक फायद्यासाठी वारंवार गुन्हे केले असतील, तर त्यास ‘संघटित गुन्हेगारी’ मानले जाते.
या गुन्हेगारांची ही साखळी तोडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी कलम १११ वाढीव लावण्याचा प्रस्ताव दिला होता, याला वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात वाघचौरे यांनी लॉज, कॅफे मालकांना आरोपी केले होते.
कायदेतज्ज्ञांच्या मते, जर हे कलम लावले नसते, तर आरोपींना साधारणतः ८ ते १० दिवसांत जामीन मिळून ते पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय झाले असते. मात्र, आता कलम १११ मुळे ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत असू शकते. या कलमाची व्याप्ती आणि तीव्रता ‘मोक्का’ कायद्यासारखीच असल्याने, आरोपींना आता किमान एक वर्ष तरी तुरुंगात राहावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 985
पिटा वेश्याव्यवसाय सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महात्मा फुले जन्मद्विशताब्दीच्या औचित्याने सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे…

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.