Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करणारा बाळासाहेबांचा विचारच शिवसेनेची ताकद: शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी
राजकारण

सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करणारा बाळासाहेबांचा विचारच शिवसेनेची ताकद: शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी

संगमनेर बस स्थानक येथे शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन; आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. त्यांच्याच विचारांची पुण्याई आहे की, एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होते. हाच वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर बस स्थानक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयघोषाने बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने हा सोहळा पार पडला.

सूर्यवंशी पुढे म्हणाले की, शिवसेनेने आजवर अनेक सामान्य माणसांच्या आयुष्यात सत्तेचे सोने केले आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पूर्वी सर्वसामान्य रिक्षाचालक होते, मात्र बाळासाहेबांच्या विचारांमुळे ते आज राज्याचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेच्या आजच्या अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांचा प्रवास पाहिला तर लक्षात येते की, त्यापैकी कोणी भाजी विक्रेता, कोणी टपरी चालक, कोणी वॉचमन तर कोणी सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील हे देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन आज विधानसभेत नेतृत्व करत आहेत, हे केवळ शिवसेनाप्रमुखांच्या धोरणामुळेच शक्य झाले. आज शिवसेना महाराष्ट्र आणि केंद्रात सत्तेत असून राज्याचा क्रमांक दोनचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा आहे, याचा सार्थ अभिमान प्रत्येक शिवसैनिकाला आहे.

या सोहळ्याला संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रमेश काळे, अजित जाधव, रोहित चौधरी, वरद बागुल, अंकुश जेधे, तन्मय नेवासकर, अवधूत आहेर, कृष्णा हासे, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, सनी धारणकर, अक्षय दिघे, समर्थ कट्यारे, अनिकेत चांगले, सिद्धार्थ तूरकुणे, मुन्ना जोशी, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, उषा कपिले, मेघना जेधे, शिवज्ञा अरगडे आणि शिवसेनेचे इतर सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 493
विनोद सूर्यवंशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.