Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तपोवन बचाव लढ्याला बळ: वनमंत्री गणेश नाईक यांची सकारात्मक भूमिका; लवकरच नाशिकचा दौरा करणार
सामाजिक

तपोवन बचाव लढ्याला बळ: वनमंत्री गणेश नाईक यांची सकारात्मक भूमिका; लवकरच नाशिकचा दौरा करणार

वनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी संविधानिक मार्गाने जे काही प्रयत्न करावे लागतील, ते सर्व करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी या वेळी आंदोलकांना दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक –

नाशिकच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची ओळख असलेल्या ‘तपोवन’ परिसराला अधिकृतपणे ‘वन’ म्हणून घोषित करण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपोवन वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रोहन देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमधील पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत नाईक यांनी आंदोलकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत तपोवनाचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले.

या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले की, माझ्यासाठी राजधर्मापेक्षा नीतिधर्म नेहमीच श्रेष्ठ असतो आणि त्याचे मी प्रामाणिकपणे पालन करतो. प्रभू श्रीरामांचे हे वन अबाधित राहणे काळाची गरज असून, या संदर्भात त्यांनी यापूर्वीच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधल्याचे स्पष्ट केले. तपोवन वाचवण्यासाठी आणि त्याला वनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी संविधानिक मार्गाने जे काही प्रयत्न करावे लागतील, ते सर्व करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी या वेळी आंदोलकांना दिले.

विशेष म्हणजे, गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ही भेट झाल्याने नाशिककरांमध्ये एक वेगळेच भावनिक नाते निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या स्मृती जपण्यासाठी वनमंत्री ‘गणेश’ नाईक यांनी दिलेला हा शब्द म्हणजे नाशिककरांनी गणरायाकडे घातलेले साकडे पूर्ण होण्यासारखे असल्याचे मत काही साहित्यिकांनी व्यक्त केले आहे.

तपोवनातील सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वनमंत्री लवकरच प्रत्यक्ष नाशिक दौरा करणार असून, वन खात्याच्या अप्पर सचिवांना या विषयाचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती रोहन देशपांडे यांनी दिली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला वैशाली दळवी, गौरव दराडे, हृषीकेश गिते यांच्यासह संबंधित शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते. वनमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे तपोवन बचाव आंदोलनाला मोठी ऊर्जा मिळाली असून नाशिकच्या पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 290
गणेश नाईक तपोवन रोहन देशपांडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.