Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकमध्ये पुन्हा लाल वादळ! पालघरमधील विजयानंतर ४०,००० शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने भव्य ‘लाँग मार्च’ सुरू
आंदोलन

नाशिकमध्ये पुन्हा लाल वादळ! पालघरमधील विजयानंतर ४०,००० शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने भव्य ‘लाँग मार्च’ सुरू

नाशिकच्या रस्त्यांवर उतरलेला हा लाल महासागर पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण तापवणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक | २५ जानेवारी २०२६

पालघरमध्ये २१ जानेवारी रोजी ५०,००० लोकांच्या उपस्थितीत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर, आता नाशिकमध्ये शेतकरी संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज, २५ जानेवारी रोजी नाशिकमधून सुमारे ५५,००० शेतकऱ्यांचा भव्य ‘लाँग मार्च’ मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या महामोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, इंद्रजित गावीत आणि उमेश देशमुख यांसारखे दिग्गज नेते करत आहेत.

हा लाँग मार्च मुख्यत्वे दोन मोठ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी काढण्यात आला आहे. वनाधिकार कायदा (FRA) आणि पेसा (PESA) अंतर्गत जमिनींचे हक्क मिळवणे, सिंचन योजनांची अंमलबजावणी करणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे भरणे यांसारख्या पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 

त्याचबरोबर, केंद्र व राज्य सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरोधातही शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. यामध्ये प्रामुख्याने स्मार्ट मीटर योजना, मनरेगा आणि ग्रामीण रोजगाराला बसणारा सुरुंग, सरकार-कॉर्पोरेट युतीद्वारे जमिनींचे होणारे संपादन आणि कामगारांवर लादल्या जाणाऱ्या चार श्रम संहिता यांसारख्या प्रश्नांवरून आरपारची लढाई लढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकच्या रस्त्यांवर उतरलेला हा लाल महासागर पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण तापवणार असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा किसान सभेने घेतला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 466
अजित नवले इंद्रजित गावीत उमेश देशमुख डी. एल. कराड नाशिक लाँग मार्च
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.