Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ झळाळी: महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांचा सन्मान! तमाशा कलावंत रघुवीर खेडकर ठरले संगमनेरच्या इतिहासाचा सुवर्णपान
यश / निवड / पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ झळाळी: महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांचा सन्मान! तमाशा कलावंत रघुवीर खेडकर ठरले संगमनेरच्या इतिहासाचा सुवर्णपान

लोकनाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवरांसह देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. कला, समाजसेवा, विज्ञान आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रासाठी यंदाचा पद्म पुरस्कार सोहळा विशेष ठरला आहे, कारण राज्यातील चार व्यक्तींना या यादीत स्थान मिळाले आहे. लोकनाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांताबाई खेडकर आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता. कृषी क्षेत्रात कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष संशोधन केल्याबद्दल परभणीचे श्रीरंग देवबा लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य सेवेसाठी आर्मिडा फर्नांडीस यांचाही पद्मश्रीने गौरव करण्यात येणार आहे, तर पालघरमधील वारली संगीतकार भिकल्य लाडक्या धिंडा यांनाही त्यांच्या कलेसाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

देशभरातील इतर मान्यवरांचा विचार करता, मध्य प्रदेशातून भगवंदास रायकर, कैलास चंद्र पंत आणि मोहन नगर यांना, तर उत्तर प्रदेशातून चिरंजी लाल यादव, रघुपत सिंह आणि डॉ. श्याम सुंदर यांना सन्मानित केले जाणार आहे. तामिळनाडूतील ओथूवर तिरुथानी, राजस्तापति कालीअप्पा गौंडर, थिरुवरूर बख्वतसलम, डॉ. पुण्यामूर्ती नटोसन आणि आर. कृष्णन यांची नावे या यादीत आहेत. जम्मू-काश्मीरमधून ब्रिज लाल भट्ट, डॉ. पद्मा गुरमेट आणि शफी शौक़ यांचा गौरव करण्यात आला आहे. ओडिशातून चरण हेम्ब्रम, महेंद्र कुमार मिश्रा आणि सिमांचल पात्रो यांना, तर गुजरातधून मीर हाजीभाई कशमभाई, धार्मिकलाल चुनीलाल पांड्या आणि नीलेश मंडलेवाला यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. कर्नाटकातील अंके गौडा, एस. जी. सुशीलेम्मा आणि सुरेश हनागवाडी तसेच राजस्थानमधील गफरुद्दीन मेवती आणि टागा राम भील यांचाही यात समावेश आहे.

या व्यतिरिक्त मणिपूरचे युनम जत्रा सिंह, तेलंगणाचे राम रेड्डी ममिडी आणि डॉ. कुमारसामी थंगराज, छत्तीसगडचे आर अँड एस गोडबोले आणि बुधरी ताथी, आसामचे नुरुद्दीन अहमद आणि पोकीला लेकटेपी, नागालँडचे सांग्युसांग एस. पोंगेनर, मेघालयाचे हैली वॉर, चंदीगडचे इंदरजीत सिंह सिद्धू, पुडुचेरीचे के. पाजनिवेल, अरुणाचल प्रदेशचे तेची गुबिन, केरळच्या कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी आणि हरियाणाचे खेम राज सुंद्रीयाल या मान्यवरांनाही त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या स्वरूपात दिले जाणारे हे पुरस्कार देशाच्या विकासात आणि संस्कृतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी प्रदान केले जातात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,127
पद्म पुरस्कार रघुवीर खेडकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.