Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलखाने पुन्हा रडारवर, संगमनेरमध्ये खाकीचा धडाका: शुक्रवारच्या बड्या कारवाईनंतर शनिवारी पुन्हा १००० किलो गोमांस जप्त, १० गोवंशांचे वाचवले प्राण! लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासन कत्तलखाने बंद करण्यात अपयशी
गुन्हेगारी

कत्तलखाने पुन्हा रडारवर, संगमनेरमध्ये खाकीचा धडाका: शुक्रवारच्या बड्या कारवाईनंतर शनिवारी पुन्हा १००० किलो गोमांस जप्त, १० गोवंशांचे वाचवले प्राण! लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासन कत्तलखाने बंद करण्यात अपयशी

या छुप्या कत्तलखान्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातत्याने होणाऱ्या कारवाईनंतर देखील कत्तलखाने सुरूच असल्याने यामागील अर्थकारण आता सर्वत्र चर्चेत आले आहे. छाप्याच्या कारवाईनंतर कोणाच्या लाईन कशा पडतात, कत्तलखान्यांच्या हप्तेखोरीमध्ये कोणाकोणाचे हात बरबटले याच्या चर्चा शहरात सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, २५ जानेवारी  | अनंत पांगारकर
संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या ३३ लाखांच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते, तोच शनिवारी पुन्हा संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १००० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून १० जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे.
शहरातील अनियंत्रित कत्तलखाने बंद करण्याचे धाडस स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी जोर धरत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने या रॅकेटचा पर्दाफाश केला. २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये छापा टाकला असता, पोलिसांना तब्बल १ हजार किलो गोमांस आढळून आले, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३ लाख रुपये आहे. या प्रकरणी समद जावेद कुरेशी आणि नवाज जावेद कुरेशी या दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केवळ मांस जप्तीवरच न थांबता पोलिसांनी त्याच दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रोडवरील जमजम कॉलनी परिसरात दुसरी मोठी कारवाई केली. या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे, चारा-पाण्याविना बांधून ठेवलेल्या १० जिवंत जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या दोन लाख रुपये किमतीच्या गोवंशांना तातडीने सायंखिडी येथील जीवदया गोशाळेत सुरक्षित हलवण्यात आले आहे. सलग दोन दिवस झालेल्या या कारवायांनी संगमनेरमधील अवैध गोवंश हत्येचे मोठे अर्थकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
ही यशस्वी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, राहुल पांडे, राहुल क्षीरसागर, विशाल कर्पे, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील बापुसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांच्या पथकाने फत्ते केली. 
पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सहाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आता या छुप्या कत्तलखान्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातत्याने होणाऱ्या कारवाईनंतर देखील कत्तलखाने सुरूच असल्याने यामागील अर्थकारण आता सर्वत्र चर्चेत आले आहे. छाप्याच्या कारवाईनंतर कोणाच्या लाईन कशा पडतात, कत्तलखान्यांच्या हप्तेखोरीमध्ये कोणाकोणाचे हात बरबटले याच्या चर्चा शहरात सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 600
कत्तलखाना कारवाई गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.