Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छात्र भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी संगमनेरचे अनिकेत घुले; मुंबईतील ४२ व्या अधिवेशनात घोषणा
यश / निवड / पुरस्कार

छात्र भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी संगमनेरचे अनिकेत घुले; मुंबईतील ४२ व्या अधिवेशनात घोषणा

अनिकेत घुले यांच्या निवडीमुळे आगामी काळात विद्यार्थी चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026Updated:26/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, २६ जानेवारी

छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी संगमनेरचे झुंजार युवा नेतृत्व साथी अनिकेत घुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात ही निवड जाहीर करण्यात आली.

या अधिवेशनासाठी छात्र भारतीचे मावळते अध्यक्ष रोहित ढाले आणि राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिकेत घुले यांची गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळख आहे. शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. विशेषतः शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी संगमनेर भागात २०२४-२५ या वर्षात विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त फीची रक्कम परत मिळवून दिली.

केवळ आंदोलनेच नव्हे, तर महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा करून ‘मराठी शाळा वाचवा’ हे अभियान प्रभावीपणे राबवले होते. यासोबतच, महाविद्यालयीन तरुणांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणे ही त्यांची वेगळी ओळख मानली जाते.

गेल्या ४२ वर्षांपासून छात्र भारती संघटना महाराष्ट्रात गरिबांच्या शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देत आहे. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण आणि भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर संघटनेने नेहमीच आवाज उठवला आहे. या संघटनेला डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. मु. ब. शहा, आमदार कपिल पाटील, डॉ. ना. य. डोळे आणि यदुनाथ थत्ते यांसारख्या दिग्गजांचा मोठा वैचारिक वारसा लाभला आहे.

अनिकेत घुले यांच्या निवडीमुळे आगामी काळात विद्यार्थी चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 270
अनिकेत घुले छात्र भारती प्रदेशाध्यक्ष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.