Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय? अवैध कत्तलखान्यावर पुन्हा पोलिसांचा छापा, १०.५७ लाखांच्या मुद्देमालासह गोमांस जप्त! कत्तलखाने बंद करण्यात यंत्रणा ठरताहेत अपयशी
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय? अवैध कत्तलखान्यावर पुन्हा पोलिसांचा छापा, १०.५७ लाखांच्या मुद्देमालासह गोमांस जप्त! कत्तलखाने बंद करण्यात यंत्रणा ठरताहेत अपयशी

पोलिसांनी घटनास्थळावरून ९ लाख रुपये किमतीचे ३००० किलो गोमांस, १ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन मोठी जनावरे व तीन वासरे, ५००० रुपये किमतीचा वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरलेली कुऱ्हाड व चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
सातत्याने कारवाया होऊन देखील संगमनेर मधील अवैध कत्तलखाने बंद होण्याचे लक्षण दिसत नाहीत. कायद्याची कोणतीही भीती नसलेल्या कसायांकडून हे कत्तलखाने राजरोसपणे सातत्याच्या छाप्यानंतर देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या वाड्यावर धाडसी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३००० किलो गोमांस, ६ जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १०,५७,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी (२७ जानेवारी) दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे केली.
या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मदिनानगर येथील एका पत्र्याच्या वाड्यात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सलमान हारून मणियार (वय ३५ वर्ष, रा. मोमिनपुरा, संगमनेर) हा इसम महाराष्ट्र राज्यात गोवंश कत्तलीस मनाई असतानाही त्या ठिकाणी कत्तल करताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून ९ लाख रुपये किमतीचे ३००० किलो गोमांस, १ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन मोठी जनावरे व तीन वासरे, ५००० रुपये किमतीचा वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरलेली कुऱ्हाड व चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्याबाबतच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर ९७/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक सुजाता थोरात या करत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, अंमलदार विशाल कर्पे, आत्माराम पवार, विवेक जाधव, विजय आगलावे आणि लक्ष्मण खेडकर यांचा समावेश होता.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 519
कत्तलखाना छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.