Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा दिशाहीन अर्थसंकल्प! – बाळासाहेब थोरात यांची मोदी सरकारवर टीका
राजकारण

जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा दिशाहीन अर्थसंकल्प! – बाळासाहेब थोरात यांची मोदी सरकारवर टीका

हा अर्थसंकल्प केवळ मोठ्या आकड्यांचा खेळ असून तो जनहिताचा नाही, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी याला 'दिशाहीन अर्थसंकल्प' म्हणून संबोधले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याण्याऐवजी ते प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या आणि दिशाहीन सरकारचा दाखला असून, सर्वसामान्यांच्या हितापेक्षा केवळ घोषणाबाजीला यात प्राधान्य देण्यात आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

आजच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय योजले गेलेले नाहीत. ठप्प झालेली वेतनवाढ, बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी ही अर्थव्यवस्थेपुढील खरी संकटे असताना, लोकांचा उपभोग वाढवण्यासाठी किंवा नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणताही विचार दिसत नाही. इतकेच नव्हे तर, देशावरील वाढता कर्जबोजा आणि रुपयाची होत असलेली घसरण यांसारख्या गंभीर बाबींकडेही सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरताना थोरात यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठीच्या निधीत कपात करण्यात आली आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि अल्पसंख्याक समुदायांसाठी कोणतीही विशेष तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. देशात आर्थिक आणि सामाजिक असमानता वाढत असताना, त्या भीषण वास्तवाचा उल्लेखही सरकारने टाळला आहे.

शेवटी, हा अर्थसंकल्प केवळ मोठ्या आकड्यांचा खेळ असून तो जनहिताचा नाही, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी याला ‘दिशाहीन अर्थसंकल्प’ म्हणून संबोधले. देशाला प्रगतीची नवी दिशा देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 427
बजेट बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.