Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हरीबाबा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार अमोल खताळ
राजकारण

हरीबाबा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार अमोल खताळ

येत्या काळात कोणत्याही टीका-टिप्पणीला उत्तर न देता केवळ विकासकामांच्या जोरावर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही आमदार खताळ यांनी शेवटी स्पष्ट केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या हरीबाबा मंदिराच्या विकासासाठी महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या देवस्थानला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला असून, आगामी काळात त्याला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन परिसराचा कायापालट करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
वेल्हाळे येथे आयोजित हरीबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जत्रेचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी देवस्थानच्या विकासकामांचा आढावा मांडला.
ते म्हणाले की, यापूर्वीच मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या देवस्थानला अधिकृतरीत्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे. तालुक्यातील विविध मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि सोयीसुविधांसाठी पर्यटन विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी आणला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी खताळ यांनी विरोधकांच्या राजकारणावर सडकून टीका केली. आपण देवाच्या दारी कधीही राजकारण करत नाही, मात्र काही लोक विनाकारण विकासकामात राजकारण आणून खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. निधी आम्ही देतोय आणि श्रेय मात्र दुसरेच घेत आहेत, असे चित्र निर्माण केले जात असून जनतेने ही वस्तुस्थिती ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.
वेल्हाळे परिसरातील पाणी प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तो सोडवण्यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. मी पूर्वीही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. जनतेची सेवा करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे यातच खरा आनंद आहे. येत्या काळात कोणत्याही टीका-टिप्पणीला उत्तर न देता केवळ विकासकामांच्या जोरावर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही आमदार खताळ यांनी शेवटी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 537
अमोल खताळ हरी बाबा देवस्थान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.