Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कामचुकार ठेकेदारांना थेट ‘ब्लॅकलिस्ट’ करा; आमदार अमोल खताळ यांचा आक्रमक पवित्रा
बैठक

कामचुकार ठेकेदारांना थेट ‘ब्लॅकलिस्ट’ करा; आमदार अमोल खताळ यांचा आक्रमक पवित्रा

बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळा आणणाऱ्या आणि कामे जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. जनतेला वेठीस धरणारे काम आणि दर्जाहीन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ठेकेदारांनी कामांची मक्तेदारी निर्माण करून अनेक कामे हाती घेतली आहेत, मात्र ती वेळेत पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेषतः नाशिक येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाकडे जाणारा निळवंडे–जांभुळवाडी फाटा, वडगावपान फाटा–तळेगाव–अकोले रस्ता आणि शहरातील एलआयसी इमारतीजवळील रस्त्यांची झालेली दुरवस्था तातडीने सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

महायुती सरकारच्या माध्यमातून या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असतानाही ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून ज्या ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत, त्यांचे अहवाल तयार करून त्यांच्या कामांच्या पुनर्निविदा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घ्यावी, असे सांगतानाच विकासकामांत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण खंबीरपणे पाठीशी असल्याचे आश्वासनही आमदार खताळ यांनी दिले.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 770
PWD अमोल खताळ आढावा बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar29/08/20260

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात…

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.