Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना महायुती आक्रमक; तोडगा न निघाल्यास टोल नाका बंद करण्याचा आमदार अमोल खताळ यांचा इशारा
आंदोलन

कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना महायुती आक्रमक; तोडगा न निघाल्यास टोल नाका बंद करण्याचा आमदार अमोल खताळ यांचा इशारा

या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी, (दि. ९) रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल कंपनीचे मालक आणि प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

टोल नाक्यावरील २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आमदार अमोल खताळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा दिला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता शिवसेना महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.

गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काही जणांच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात कामगारांनी पुकारलेल्या साखळी उपोषणाला आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला.

यावेळी कामगार वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी टोल व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना घटनास्थळावरूनच धारेवर धरले आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याबाबत जाब विचारला.

या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी, (दि. ९) रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल कंपनीचे मालक आणि प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास महायुतीच्या वतीने तीव्र संघर्ष करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

नवीन कंपनी आली म्हणून जुन्या कामगारांना देशोधडीला लावणे कायद्याला धरून नसल्याचे सांगत, आमदार खताळ यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाच्या संचालकांना कडक सूचना दिल्या आहेत.

यावेळी आमदार खताळ यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 498
अमोल खताळ आंदोलन टोल नाका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.