Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंदनापुरी घाटातील ‘लुटारू टोळी’वर नवीन कायद्यानुसार ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई
गुन्हेगारी

चंदनापुरी घाटातील ‘लुटारू टोळी’वर नवीन कायद्यानुसार ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई

आरोपींमध्ये प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर), रोहित विठ्ठल साळवे (रा. बिल्लोरी, नाशिक), अतुल संजय बटवाल (रा. ढोलेवाडी, संगमनेर) आणि सिद्धार्थ दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर) यांचा समावेश आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या आधीही संगमनेर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडल्यानंतर या टोळीवर देखील बीएनएसच्या कलम १११ कारवाई केली होती.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हरिष रामसिंग सोनार (वय २३, रा. शिंदे पळसे, नाशिक) हे ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोन ते पाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरून जात होते. चंदनापुरी घाटातील हॉटेल लक्ष्मीच्या पाठीमागे आरोपींनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुरुवातीला कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावत चार आरोपींना निष्पन्न केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर), रोहित विठ्ठल साळवे (रा. बिल्लोरी, नाशिक), अतुल संजय बटवाल (रा. ढोलेवाडी, संगमनेर) आणि सिद्धार्थ दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेली मालमत्ता देखील हस्तगत केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता, त्यांच्यावर संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. हे आरोपी संघटित टोळी बनवून, हिंसेचा किंवा धाकधपटशाचा वापर करून बेकायदेशीर मार्गाने लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आदेशानुसार या गुन्ह्यात बी.एन.एस. कलम १११ ची वाढ करण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,384
बीएनएस कलम 111 मावस टोळी संघटित गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.