Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

June 19, 2026

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

June 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये धावपटूंचा महाकुंभ; मालपाणी स्मृती सफायर-मॅरेथॉनला दोन हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक

संगमनेरमध्ये धावपटूंचा महाकुंभ; मालपाणी स्मृती सफायर-मॅरेथॉनला दोन हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धेत सहभागी होऊन अंतर पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला 'प्रत्येक रनर हा विनर' या संकल्पनेतून सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुमारे दोन हजार धावपटूंनी सहभाग नोंदवून संगमनेरच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडविला. संगमनेरकरांमधील ही आरोग्यविषयक जागरूकता शहराच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असल्याची भावना क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी यावेळी व्यक्त केली.

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ लायन्स क्लब संगमनेर सफायरने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शरीराला व्यायामाची सवय लागावी आणि निरोगी आरोग्याचा संदेश घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत ७ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांचा समावेश होता. 

लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. यावेळी अग्रवाल यांनी भव्य आयोजनाबद्दल क्लबचे कौतुक केले. या स्पर्धेत सहभागी होऊन अंतर पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला ‘प्रत्येक रनर हा विनर’ या संकल्पनेतून सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याकामी मालपाणी उद्योग समूह, स्वदेश उद्योग समूह आणि समता पतसंस्थेचे विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष कल्याण कासट, सचिव सुमीत मणियार, खजिनदार नामदेव मुळे आणि प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या टीमने परिश्रम घेतले. यामध्ये कृष्णा आसावा, अतुल अभंग, चैतन्य काळे, अक्षय गोरले, कल्पेश मर्दा, गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिवंसरा, महेश डंग, डॉ. अमोल पाठक, राजेश रा. मालपाणी, अजित भोत, उमेश कासट, सीए प्रशांत रुणवाल, देविदास गोरे, धनंजय धुमाळ, जितेंद्र पाटील, विशाल थोरात, हरमीतसिंग डंग, संदीप गुंजाळ, संतोष अभंग, रोहित मणियार, हरज्योतसिंग बत्रा, शुभम तवरेज, अनन्या धुमाळ, डॉ. मधुरा पाठक, मंजुषा भोत, नम्रता अभंग, प्रीती काळे, प्रियंका कासट, वंदना मणियार, मीनल अभंग, अंजली पाटील, चैताली जोर्वेकर आणि पायल शहा या सर्व सदस्यांचा प्रकल्प समितीमध्ये समावेश होता. या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

📌 नियमित चालणे, धावणे इत्यादी व्यायाम निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस स्वतःसाठी देऊन धावण्याच्या व्यायाममधून चांगल्या सवयी शरीराला लागाव्यात. निरोगी आयुष्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. असा संदेश देण्यात आम्ही यशस्वी झालो. गिरीश मालपाणी.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 541
गिरीश मालपाणी माधवलालजी मालपाणी मॅरेथॉन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली… सरकारला थेट इशारा

June 17, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

पेमगिरीच्या ‘हेरिटेज वॉक’मधून उलगडला ऐतिहासिक वैभव; शहागड आणि महाकाय वटवृक्षाला अभ्यासकांची भेट

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

By अनंत पांगारकरJune 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाशी, पक्षप्रमुख…

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

June 19, 2026

आज शुक्रवार, १९ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.