Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे विभाजन, अहिल्यानगर सोबतच स्वतंत्र शिर्डी कार्यालय कार्यान्वित; ऋषिकेश इंगळे नवे अधीक्षक
प्रशासन

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे विभाजन, अहिल्यानगर सोबतच स्वतंत्र शिर्डी कार्यालय कार्यान्वित; ऋषिकेश इंगळे नवे अधीक्षक

जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा दीर्घकाळापासून सुरू असली, तरी महसूल, पोलीस आणि परिवहन विभागानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागानेही शिर्डीत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –

अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे विभाजन केले आहे. आता जिल्ह्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी अशी दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यालये निर्माण करण्यात आली असून, शिर्डीच्या अधीक्षकपदी ऋषिकेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येणार असून, राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या सहा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या अहिल्यानगरमध्ये आता दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यरत असतील. नगर कार्यालयाची धुरा अधीक्षक सोनोणे यांच्याकडे कायम असून, शिर्डीसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारणीला सुरुवात झाली आहे.

या नवीन रचनेनुसार तालुक्यांची विभागणी अत्यंत स्पष्टपणे करण्यात आली आहे. अहिल्यानगर कार्यालयांतर्गत अहिल्यानगर शहर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी आणि शेवगाव या सात तालुक्यांचा समावेश असेल. तर नवनियुक्त शिर्डी कार्यालयाकडे नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर आणि अकोले या उत्तर भागातील सात तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिर्डी कार्यालयासाठी एकूण १७ पदे मंजूर करण्यात आली असून यामध्ये कार्यालय अध्यक्ष, लघुलेखक, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, जवान आणि वाहनचालक अशा विविध संवर्गांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिर्डीसाठी स्वतंत्र भरारी पथकाचीही तरतूद करण्यात आली आहे.

सध्या शिर्डी कार्यालयासाठी पदे मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात पदभरती पूर्ण होईपर्यंत अहिल्यानगर कार्यालयातील उपअधीक्षक आणि निरीक्षकांकडे शिर्डीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करताना ती पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे गुन्हे नियंत्रण आणि महसूल वसुलीत सुसूत्रता येईल.

जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा दीर्घकाळापासून सुरू असली, तरी महसूल, पोलीस आणि परिवहन विभागानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागानेही शिर्डीत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 833
राज्य उत्पादन शुल्क शिर्डी कार्यालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.