Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायाचा कागद हातात, पण ताबा मात्र स्वप्नवत; संगमनेर महसूल विभागाचा ‘ढिम्म’ कारभार; हक्काच्या जमिनीसाठी उपोषणकर्त्याचा जीव टांगणीला! प्रशासनावर अदृश्य ‘दबाव’ कुणाचा?
आंदोलन

न्यायाचा कागद हातात, पण ताबा मात्र स्वप्नवत; संगमनेर महसूल विभागाचा ‘ढिम्म’ कारभार; हक्काच्या जमिनीसाठी उपोषणकर्त्याचा जीव टांगणीला! प्रशासनावर अदृश्य ‘दबाव’ कुणाचा?

वरिष्ठ महसूल कार्यालयाचे आदेश असतानाही केवळ प्रशासकीय मुजोरीमुळे हा न्याय रखडल्याचे चित्र दिसत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (विशेष प्रतिनिधी):

शासन ‘प्रशासन आपल्या दारी’चा डांगोरा पिटत जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत असले, तरी संगमनेर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे एका सर्वसामान्य नागरिकाला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी चक्क मृत्यूला साद घालण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असूनही जर जमिनीचा ताबा मिळत नसेल, तर हे प्रशासन नेमके कोणाच्या दावणीला बांधले आहे, असा संतप्त सवाल उपोषणकर्ते गणेश रासने यांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय ढिम्म कारभारामुळे हतबल झालेल्या रासने यांनी आता थेट ‘माझा बळी घेतल्यावरच जमीन मोकळी करणार का?’ असा सवाल विचारत तहसीलदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

संगमनेर येथील रहिवासी गणेश अनंत रासने यांची वडगाव पान शिवारात गट नंबर १३/१ मध्ये ६१ गुंठे हक्काची खरेदी केलेली जमीन आहे. या जमिनीतील १७ गुंठे क्षेत्रावर जनार्दन सहादू गायकवाड व इतरांनी गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. रासने यांनी या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा दिला असून, उपविभागीय अधिकारी (प्रांत) संगमनेर आणि अपर आयुक्त नाशिक यांनी कागदपत्रांची पडताळणी करून रासने यांच्या बाजूने निकाल दिला आहे. हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करून जमिनीचा ताबा देण्याचे स्पष्ट आदेश पारित होऊन ३३ महिने उलटले आहेत. मात्र, महसूल विभागाने या आदेशांना केराची टोपली दाखवत केवळ तारखांचा खेळ मांडला असल्याचा आरोप रासने यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी देश प्रजासत्ताक दिन साजरा करत होता, त्याच २६ जानेवारीला गणेश रासने यांना आपल्या कुटुंबासह सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात उपोषणाला बसावे लागले. एकीकडे वरिष्ठ अधिकारी संविधानाचा सन्मान करत असताना, दुसरीकडे त्याच संविधानाने दिलेल्या हक्कासाठी एक कुटुंब भर थंडीत न्यायाची याचना करत होते. यावेळी एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूस करण्याची तसदी न घेतल्याने प्रशासनाची असंवेदनशीलता चव्हाट्यावर आली आहे.

या संदर्भात तहसीलदार धीरज मांजरे यांनी ६ जानेवारी २०२६ रोजी संयुक्त कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी जर कारवाई झाली होती, तर मग आजही जमिनीवर अतिक्रमण कायम कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर १५ दिवस उलटूनही ठोस कारवाई न झाल्याने, प्रशासनावर कोणता तरी अदृश्य ‘दबाव’ आहे का, अशी शंका आता व्यक्त होत आहे. वरिष्ठ महसूल कार्यालयाचे आदेश असतानाही केवळ प्रशासकीय मुजोरीमुळे हा न्याय रखडल्याचे चित्र दिसत आहे. जर माझ्या आरोग्याला काही बरे-वाईट झाले, तर त्याला तहसीलदार आणि संबंधित मंडल अधिकारी जबाबदार असतील, असा निर्वाणीचा इशारा रासने यांनी दिला आहे. आता या प्रकरणी शासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 928
आंदोलन गणेश रासने
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.