Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कामगारविरोधी लेबर कोड रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचे मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
आंदोलन

कामगारविरोधी लेबर कोड रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचे मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2026Updated:12/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

केंद्र सरकारने नुकतेच लागू केलेले चार कामगार कायदे (लेबर कोड) रद्द करावेत आणि ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना बंद करून पुन्हा ‘मनरेगा’ योजना सुरू करावी, या मागणीसाठी संगमनेर तालुका तंबाखू (जर्दा) कामगार युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०२५ मध्ये अस्तित्वात आणलेले चार लेबर कोड हे पूर्णपणे कामगारविरोधी आहेत. हे कायदे लागू करताना कामगारांच्या हिताचे जुने २९ कायदे रद्द करण्यात आले असून, भांडवलदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या फायद्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर कामगारांनी मोठा संघर्ष करून मिळवलेले किमान वेतन कायदा, बोनस कायदा, पेन्शन आणि ई.एस.आय. यांसारखे हक्क या नवीन कायद्यांमुळे धोक्यात आले आहेत. नवीन लेबर कोडमध्ये कायमस्वरूपी रोजगाराऐवजी ठराविक कालावधीची नोकरी, दिवसाचे १२ तास काम करण्याची तरतूद आणि कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देण्यात आले आहे, यामुळे कामगारांवर मोठा अन्याय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, ग्रामीण भागातील मजुरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘मनरेगा’ योजना रद्द करून त्याऐवजी ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना आणल्याने मजुरांचा रोजगाराचा अधिकार हिरावून घेतला जात आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली जनसुरक्षा विधेयक मंजूर केले असले तरी, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनावर तंबाखू कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. माधव नेहे, सरचिटणीस कॉ. ॲड. ज्ञानदेव सहाणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रताप सहाणे, कॉ. भिका वाघ, तसेच किसान सभेचे अध्यक्ष कॉ. सयाजी कानवडे आणि सचिव कॉ. नारायण मेमाणे यांच्या सह्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 618
आंदोलन तंबाखू कामगार मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.