Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘स्वराज’ शब्द दादाभाई नवरोजींनीच भारतीय राजकारणात रुजवला; ॲड. अनिल नौरीया यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र संवाद विशेष

‘स्वराज’ शब्द दादाभाई नवरोजींनीच भारतीय राजकारणात रुजवला; ॲड. अनिल नौरीया यांचे प्रतिपादन

दुर्दैवाने, मुंबईचे सुपुत्र असूनही वर्सोवा येथील त्यांच्या जन्मस्थानाचा ठावठिकाणा आज कोणालाही माहीत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
भारतीय राजकारणात ‘स्वराज’ हा शब्द सर्वप्रथम प्रचलित करण्याचे कार्य दादाभाई नवरोजी यांनी केले. दादाभाईंनी केलेली ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची मीमांसा हाच भारतीय राष्ट्रवादाचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध राजकीय भाष्यकार ॲड. अनिल नौरीया यांनी केले.
ॲड. नौरीया पुढे यांनी दादाभाई नवरोजी आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक व भावनिक नाते उलगडताना त्यांनी या गौरवशाली इतिहासाचा विसर पडत असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. दादाभाई नवरोजींच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद गुजराती, मराठी, उर्दू आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये झाला होता, ज्यातून त्यांच्या विचारांचा प्रसार देशभर झाला.
त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय तेव्हा येत असे, जेव्हा ते दिल्लीला जात असताना रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी लोक त्यांच्या स्वागतासाठी गर्दी करत. लाहोरमध्ये तर त्यांचे स्वागत ‘हिंद का दादा’ अशा शब्दांत करण्यात आले होते. महात्मा गांधींसाठी दादाभाई हे पितृतुल्य होते आणि स्वतः गांधीजींनी त्यांच्यासाठी ‘महात्मा’ हे संबोधन वापरले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
दुर्दैवाने, मुंबईचे सुपुत्र असूनही वर्सोवा येथील त्यांच्या जन्मस्थानाचा ठावठिकाणा आज कोणालाही माहीत नाही. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दादाभाई नवरोजी यांची द्विजन्मशताब्दी होती, मात्र मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार किंवा स्वातंत्र्यलढ्याचा वारसा सांगणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला आणि संघटनेला याचे स्मरण नसावे, ही खेदाची बाब आहे. राष्ट्र हे लोकांच्या सामुहिक स्मृतीतून घडत असते, परंतु सध्या समाजाला स्मृतीभ्रंश झाला असून त्यातूनच हिंदुत्ववाद फोफावत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजा अवसक, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पिंपळगाव माथा सरपंच सविताताई पांडे, ॲड. निशाताई शिवूरकर, सुरेखा उबाळे, जुबेर इनामदार, प्रा. शिवाजी गायकवाड, लोकपंचायतचे विश्वस्त सारंग पांडे, जयसिंग सहाणे, दत्ता ढगे, रजत अवसक, मोहसीन शेख आणि ॲड. ऋषिकेश म्हस्कुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 289
अनिल नौरिया दादाभाई नवरोजी व्याख्यान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.