Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आरटीओच्या ‘दंडेलशाही’विरोधात संगमनेरचे रिक्षाचालक आक्रमक; ठाकरे गटाचा १ मार्चपासून ‘रिक्षा बंद’चा इशारा
आंदोलन

आरटीओच्या ‘दंडेलशाही’विरोधात संगमनेरचे रिक्षाचालक आक्रमक; ठाकरे गटाचा १ मार्चपासून ‘रिक्षा बंद’चा इशारा

या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सकारात्मक पाऊल उचलत अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ या दोन्ही लोकप्रतिनिधींना त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित ‘वाहतूक सेना’ आणि ‘रिक्षा सेने’च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या अन्यायकारक दंडवसुलीविरोधात १ मार्चपासून संगमनेर शहर व तालुक्यात ‘रिक्षा बंद’ करण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे.

वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख आणि तालुकाप्रमुख अशोक बढे यांनी प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. आरटीओ अधिकारी ४ हजार रुपयांचा दंड सांगून प्रत्यक्षात एजंटमार्फत कोणतीही पावती न देता ८ ते १० हजार रुपये लाच स्वरूपात उकळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

रिक्षाचालकांचे मासिक उत्पन्न अवघे १५ हजार रुपये असताना, एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त दंड आकारणे ही ‘हुकूमशाही’ असल्याची भावना व्यक्त होत आहे. गाडीचे पासिंग नसणे, एखादा अतिरिक्त प्रवासी असणे किंवा पीयूसी/एनओसी नसल्यास ताकीद देण्याऐवजी थेट रिक्षा जप्त केल्या जात असल्याने चालकांमध्ये तीव्र संताप आहे.

या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सकारात्मक पाऊल उचलत अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ या दोन्ही लोकप्रतिनिधींना त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. दोन्ही आमदारांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देखील या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. याशिवाय या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरटीओ अहिल्यानगर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख (वाहतूक सेना) इम्तियाज शेख, संगमनेर शहरप्रमुख फैसल शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमित चव्हाण, आश्वी ग्रामीण तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे आणि भीमाशंकर पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच उपतालुकाप्रमुख संजय सोनवणे, दत्तू नाईक, रवींद्र गिरी, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख संभव लोढा, अमोल डुकरे, शानू शेख, रफिक शेख, महमूद सय्यद, परवेज शेख, रहीम बेग, दीपक वनम, माघाडे यांच्यासह रिक्षा सेना आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय गंभीर तेथे ठाकरेंचे शिवसैनिक खंबीर असा नारा देत, जर ही दंडवसुली तात्काळ थांबली नाही, तर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे ‘ठिय्या आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा अशोक बढे यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 608
आरटीओ निवेदन रिक्षा सेना लूट शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.