Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छात्र भारतीच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा संगमनेरमध्ये नागरी सत्कार
सामाजिक

छात्र भारतीच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा संगमनेरमध्ये नागरी सत्कार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

मुंबई येथे संपन्न झालेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, जयहिंद लोक चळवळ तसेच विविध सामाजिक, राजकीय व पुरोगामी संघटनांच्या वतीने के. बी. दादा देशमुख सभागृहात अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तांबे यांनी राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती या संघटना पुरोगामी विचार आणि भक्कम वैचारिक अधिष्ठान असणारी नवी पिढी घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

राष्ट्र सेवा दलाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी छात्र भारती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत असल्याचा गौरव केला व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्र सेवा दल व शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. आम्ही नेहमीच विवेकी आणि पुरोगामी विचारांच्या पाठीशी उभे राहिलो असून, जिथे चूक असेल तिथे काँग्रेसच्या विरोधातही उभे राहण्यास मागे-पुढे पाहिले नाही, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

आपल्या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त राज्य अध्यक्ष अनिकेत घुले म्हणाले की, छात्र भारती ही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रभर लढणारी संघटना आहे. शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या परिस्थितीत छात्र भारती कोणत्याही दबावाला बळी न पडता विद्यार्थी हितासाठी जोमाने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, कॉम्रेड कारभारी उगले, हिरालाल पगडाल सर, सीतारामजी राऊत, छात्रभारतीचे माजी अध्यक्ष रोहित ढाले, राष्ट्रसेवा दलाचे अहिल्यानगरचे माजी अध्यक्ष समीर लामखडे, संदीप काकड, राष्ट्रसेवा दलाचे तालुकाध्यक्ष राम चन्ना, मोहम्मद कैफ, राजाभाऊ अवसक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माजी कार्याध्यक्षा रंजना गवादे, गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील, अजय फटांगरे, चंद्रकांत घुले, रवी दिवे, अनुराधा आहेर, राहुल जऱ्हाड यांसह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी छात्रभारतीच्या इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 347
अनिकेत घुले छात्र भारती नागरी सत्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई / संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ…

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.