Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेत नगराध्यक्षांच्या पतीचा हस्तक्षेप; महायुती आक्रमक, नगराध्यक्षपद रद्द करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
राजकारण

संगमनेर पालिकेत नगराध्यक्षांच्या पतीचा हस्तक्षेप; महायुती आक्रमक, नगराध्यक्षपद रद्द करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

या तक्रारीमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत महायुतीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची आणि नगराध्यक्षांचे पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्षम करण्यासाठी शासनाने ५० टक्के आरक्षण दिले असून, महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी विशेष शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या नियमानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला किंवा नातेवाईकांना संबंधित संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे. मात्र, संगमनेर नगरपालिकेत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
निवडणुकीपासून आमदार सत्यजित तांबे हे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात सातत्याने हस्तक्षेप करत असून, ते प्रत्यक्ष नगरपालिकेत उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही बाब लोकशाही मूल्यांच्या आणि प्रशासकीय नियमांच्या विरोधात असल्याचे सांगत महायुतीने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
या तक्रारीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ चा संदर्भ देण्यात आला आहे. या कलमानुसार, मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांची कोणतीही कृती कायद्याविरुद्ध आढळल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे अधिकार आहेत. याच अधिकाराचा वापर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्यासह अजित जाधव, विशाल एनगंदुल, अक्षय वर्पे, सिद्धार्थ तुरकने, प्रवीण कर्पे, समर्थ कट्यारे आणि अनिकेत चांगले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जर या प्रकरणात राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ झाली, तर मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. या तक्रारीमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,384
आक्षेप मैथिली तांबे संगमनेर नगर परिषद साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

अहिल्यानगर | प्रतिनिधी: येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी (…

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.