Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महावितरणचा अजब कारभार! संगमनेरच्या मुख्य जलवाहिनीवरच रोवले वीज पोल; ‘टीम RGSS’ आक्रमक, आंदोलनाचा इशारा
सामाजिक

महावितरणचा अजब कारभार! संगमनेरच्या मुख्य जलवाहिनीवरच रोवले वीज पोल; ‘टीम RGSS’ आक्रमक, आंदोलनाचा इशारा

निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर शहर आणि परिसराची तहान भागवणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चक्क वीज पोल उभे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर चुकीमुळे हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, राहुल गांधी समर्थक संघ (TEAM RGSS) महाराष्ट्र आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत. यामुळे पाईपलाईनच्या संरक्षक आवरणाला आधीच मोठी इजा झाली असून, भविष्यात पाईपलाईन फुटल्यास मोठी पाणी कपात सोसावी लागण्याची भीती आहे. सर्वात भयानक बाब म्हणजे, ही पाईपलाईन लोखंडी असल्याने वीज पोलमधून विद्युत प्रवाह उतरल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ‘डेथ ट्रॅप’ बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर विषयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोल रोवताना पाईपलाईनचे जे नुकसान झाले आहे, त्याची दुरुस्ती करून हे सर्व वीज पोल सुरक्षित अंतरावर तातडीने हलवण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संस्थेने दिला आहे.

महावितरण आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका सामान्य जनतेला बसत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. आता वीज वितरण कंपनी यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हे निवेदन देतेवेळी राम अरगडे, सतीश खताळ, अमोल शेलकर, अरुण चव्हाण, प्रकाश कडलग, रवींद्र हासे, प्रवीण हासे, सचिन वाळे, शंतनू भालेकर आणि मोहसीन शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 654
RGSS महावितरण राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.