Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोले परिसरात अवैध दारू वाहतूक करणारी स्विफ्ट कार जप्त; सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई
गुन्हेगारी

अकोले परिसरात अवैध दारू वाहतूक करणारी स्विफ्ट कार जप्त; सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ही दारू अभिजित रणशूर (रा. संगमनेर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले:

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांच्या कार्यालयातील पथकाला अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे आणि राजेंद्र बिरदवडे हे पथक गस्त घालत होते. यावेळी धामणगाव पाट ते कोतूळ जाणारे रोडने एका स्विफ्ट डिझायर कारमधून (क्र. एम.एच.०५ बी एक्स ५६३५) दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे यांना मिळाली.

या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत कोतूळ क्षेत्रातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल जाधव आणि महेंद्र गुंजाळ यांना सोबत घेत दोन पंचांसह हायटेक नर्सरी जवळ सापळा रचला असता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबंधित कार येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या आढळल्या. गाडीची झडती घेतली असता ६१ हजार १५० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ९२४ बाटल्या मिळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी गाडी चालक अक्षय मारुती वाकचौरे (वय २६, रा. परखतपूर, ता. अकोले) आणि त्याच्यासोबत असलेला राजेंद्र बाळासाहेब तांबे (वय ३०, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ही दारू अभिजित रणशूर (रा. संगमनेर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या कारवाईत दारू साठा, स्विफ्ट डिझायर गाडी आणि दोन मोबाईल असा एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या अक्षय वाकचौरे, राजेंद्र तांबे आणि फरार असलेला अभिजित रणशूर यांच्या विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 827
अकोले पोलीस अपर पोलीस अधीक्षक दारू कारवाई सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar17/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जापूर्ण ठरेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी अंगावर पडू…

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.