Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीस दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा; सत्र न्यायालयाचा निकाल
न्यायालय

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीस दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा; सत्र न्यायालयाचा निकाल

सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले यांचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश गांगुर्डे याला शिक्षा सुनावली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूरचे सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याला न्यायालयाने दोषी ठरवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वसुली पथक श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. २, सुभेदार वस्ती भागात थकीत वीज बिल वसुलीसाठी आणि कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते. ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी पथक पोहोचले असता, ग्राहक, त्यांचा मुलगा गणेश गांगुर्डे आणि पत्नी बबीता गांगुर्डे यांनी वीज बिल भरण्यास स्पष्ट नकार दिला. काय करायचे ते करा, असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी विद्युत सहाय्यक फारूक तडवी हे वीज कनेक्शन कट करण्यासाठी पोलवर चढत असताना आरोपी गणेश गांगुर्डे याने त्यांना लाकडी दांडक्याने मारण्याचा प्रयत्न केला.

या गंभीर प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर महावितरणचे अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ गोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांनाही जुमानले नाही. आरोपीने अभियंता गोरे यांची गचांडी धरून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी गोरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गु.र.नं. २८४/२०१५ नुसार भारतीय दंड विधान कलम ३५३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हबीब यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले यांचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश गांगुर्डे याला शिक्षा सुनावली. या कामात सरकारी अभियोक्ता प्रसन्न गटणे, पोलीस उपनिरीक्षक घाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 709
न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.