Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतही ‘ध्रुव ग्लोबल’ चॅम्पियन!अकरा सुवर्णपदकांसह पाच चषके; तेज जैनचा स्पर्धावीर पुरस्काराने गौरव
क्रिडा व कला

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतही ‘ध्रुव ग्लोबल’ चॅम्पियन!अकरा सुवर्णपदकांसह पाच चषके; तेज जैनचा स्पर्धावीर पुरस्काराने गौरव

त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघांची मात्र पूरती गाळण उडाली आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 50 धावांमध्ये गुंडाळला गेला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
शिर्डीच्या गोल्डन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या राज्यस्तरीय 50 बॉल क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा संघ चॅम्पियन ठरला. राज्यातून आलेल्या विविध शालेय संघांचा समावेश असलेल्या या अतितटीच्या स्पर्धेत ध्रुवच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना 11 सुवर्ण पदकांसह पाच चषकांची कमाई केली. शाळेच्या तेज जैनला ‘प्लेअर ऑफ द चॅम्पियन’ तर, प्रणव काकडेला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. याशिवाय शाळेच्या खेळाडूंनी अन्य व्यक्तिगत पुरस्कार पटकावताना या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पंधरा वर्षांखालील मुलांच्या संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी 50 चेंडूचे सामने खेळवण्यात आले. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ध्रुवच्या संघाने पुणेसंघाचा 64 धावांमध्ये खुर्दा पाडतांना कोणत्याही गड्याच्या बदल्यात विजय मिळवला. त्यानंतरच्या उपांत्यपूर्व सामन्यात अमरावती संघासमोर 133 धावांचा डोंगर उभा करीत ध्रुवने अवघ्या 52 धावांतच प्रतिस्पर्धी संघाला गारद केले.
उपांत्य फेरीत धुळे संघाविरोधात प्रथम फलंदाजी करताना ध्रुवने 128 धावांचे लक्ष्य उभे केले. त्याचा बचाव करताना संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत धुळ्याचा संपूर्ण संघ अवघ्या 48 धावांतच गुंडाळला आणि तब्बल 80 धावांनी विजय मिळवताना अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला. अंतिम सामन्यातही ध्रुव ग्लोबलच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 चेंडूत नाशिकच्या संघासमोर 131 धावांचे आव्हान उभे केले. त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघांची मात्र पूरती गाळण उडाली आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 50 धावांमध्ये गुंडाळला गेला.
या संपूर्ण स्पर्धेत दोन अर्ध शतकांसह सर्वाधीक धावा करणार्‍या ध्रुवच्या तेज जैनला स्पर्धावीर व अंतिम सामन्यात 48 धावांसह गोलंदाजीत दोन बळी घेणार्‍या प्रणव काकडे याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या स्पर्धेत आठ बळी घेणारा सोहम करपे उत्कृष्ट गोलंदाज ठरला तर, स्पर्धेत चमकदार क्षेत्ररक्षण करणार्‍या यश बियाणीलाही विशेष पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेच्या चॅम्पियनशीपचा किताब पटकावणार्‍या ध्रुवच्या संघात तेज जैन, श्रवण मुंदडा, आनंद बोरा, प्रणव काकडे, सोहम करपे, विनित भन्साळी, शौर्य फटांगरे, रुद्र अभंग, धनराज डाके, साहिल शिरसाठ आणि अद्वैत ढोली यांचा समावेश होता. क्रीडा प्रशिक्षक महेश जंगम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या घवघवीत यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 394
ध्रुव ग्लोबल राज्यस्तरीय क्रिकेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

June 22, 2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

April 22, 2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

March 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.