Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यात १५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा
प्रशासन

जिल्ह्यात १५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा

उर्वरित दोन दिवसांसाठी राज्य शासनाच्या अटींच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने परवानगी देता येईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –

जिल्ह्यात सन २०२६ मधील सण व उत्सवांच्या काळात एकूण १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी परवानगी दिली आहे.

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०१७ नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून, श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहील.

जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या या १५ दिवसांमध्ये १९ फेब्रुवारी रोजीची शासकीय शिवजयंती, १४ एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन व २६ ऑगस्ट रोजीच्या ईद-ए-मिलादचा समावेश आहे. याशिवाय गणपती उत्सवात १५ सप्टेंबर रोजीचा दुसरा दिवस, १८ सप्टेंबर रोजीचे गौरी पूजन, १९ सप्टेंबर रोजीचे गौरी विसर्जन व २५ सप्टेंबर रोजीची अनंत चतुर्दशी असे चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येतील.

नवरात्रोत्सवात ११ ऑक्टोबर रोजीची अष्टमी व २० ऑक्टोबर रोजीची नवमी, तर दीपावलीमध्ये ८ नोव्हेंबर रोजीचे लक्ष्मीपूजन, २५ डिसेंबर रोजीचा ख्रिसमस व ३१ डिसेंबर या दिवशीदेखील ध्वनिक्षेपकासाठी सूट देण्यात आली आहे. उर्वरित दोन दिवसांसाठी राज्य शासनाच्या अटींच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने परवानगी देता येईल.

या उत्सव काळात ध्वनी प्रदूषण नियम २००० मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. पोलीस प्रशासनाने शांतता क्षेत्राची माहिती घेऊन ध्वनीचे नमुने घ्यावेत व याबाबतची नोंद पंचनामा करून ठाणे दैनंदिनीमध्ये करावी. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वसामान्य जनतेची तक्रार आल्यास घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष ध्वनीची तीव्रता मोजावी व छायाचित्रण करावे. मोजलेली तीव्रता विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास अहवाल उचित प्राधिकरणाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 706
ध्वनिक्षेपक पंकज आशिया
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.