Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

June 19, 2026

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

June 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या सहकारी शिक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी; संगमनेर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
न्यायालय

महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या सहकारी शिक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी; संगमनेर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती पायल बी. एखंडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शाळेसारख्या पवित्र ठिकाणी सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग करून तिला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकाला संगमनेर न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. संगमनेर येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयातील ही धक्कादायक घटना असून, आरोपी शिक्षक दत्तु किसन कौटे याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांनी दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये पीडित शिक्षिकेने आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त मिळालेला पुष्पगुच्छ शाळेत आणला होता, तो विद्यार्थ्यांनी दहावीच्या निरोप समारंभात मुख्याध्यापकांना भेट म्हणून दिला. या साध्या कारणावरून आरोपी दत्तु कौटे याने पीडितेशी वाद उकरून काढला होता. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी स्टाफ रूममध्ये पीडितेचा उपरोधिक भाषेत अपमान केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी आरोपीने क्रूरतेची सीमा ओलांडली. सकाळी ८:२० वाजता पीडित शिक्षिका शाळेच्या रंगमंचावर बसलेली असताना आरोपीने तिथे येऊन भर विद्यार्थ्यांसमोर तू किती नालायक आहेस हे मला माहीत आहे अशा शब्दांत तिचा अपमान केला. केवळ शाब्दिक चकमकीवर न थांबता, आरोपीने पीडितेचा हात धरून तिचा विनयभंग केला आणि तिच्या गालावर जोरात चापट मारली. या हल्ल्यामुळे पीडित शिक्षिका जागीच बेशुद्ध होऊन खाली पडली होती.

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कॉन्स्टेबल संपत जायभाय यांनी या गंभीर प्रकरणाचा तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोप पत्र दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती पायल बी. एखंडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी पीडित महिला आणि तिच्या पतीसह एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. आरोपीने बचावासाठी केलेले सर्व दावे फेटाळून लावत न्यायालयाने पीडितेची साक्ष विश्वसनीय मानली. एका महिला शिक्षिकेच्या बाबतीत घडलेली ही घटना समाजासाठी घातक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

या खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ११५(२) आणि ३५२ अन्वये आरोपीला दोषी धरले. न्यायालयाने आरोपी दत्तु कौटे याला तीन वर्षांचा सक्तमजुरीचा कारावास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, दंडाची ही १० हजार रुपयांची रक्कम पीडित शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 3,105
निर्णय न्यायालय शिक्षा संगमनेर कोर्ट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

By अनंत पांगारकरJune 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाशी, पक्षप्रमुख…

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

June 19, 2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

June 19, 2026

आज शुक्रवार, १९ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.