Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळुंगीच्या स्वच्छतेसाठी शिवसेना नगरसेविका आक्रमक; १५ दिवसांत काम न झाल्यास नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात ठिय्या देणार!
राजकारण

म्हाळुंगीच्या स्वच्छतेसाठी शिवसेना नगरसेविका आक्रमक; १५ दिवसांत काम न झाल्यास नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात ठिय्या देणार!

१५ दिवसांच्या अल्टिमेटममुळे आता नगरपरिषद प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2026Updated:18/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीला सध्या घाणीच्या साम्राज्याने ग्रासले असून, नदीपात्रातील साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी आक्रमक पवित्रा घेत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १५ दिवसांत नदीची स्वच्छता न झाल्यास प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
शहरातील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर पाण्याचा निचरा करणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याला दुर्गंधी सुटली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. साक्षी सूर्यवंशी यांनी निवेदनात नमूद केले की, यापूर्वीही तोंडी आणि लेखी स्वरूपात वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाचे हे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतणारे आहे.
यावेळी बोलताना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, जर तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले असेल, तर नगरपालिकेने आगामी सर्वसाधारण सभेत हा विषय तातडीने विषयपटलावर घ्यावा. परंतु, कोणत्याही परिस्थितीत म्हाळुंगी नदी स्वच्छ करून साचलेल्या गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोग्य व स्वच्छता विभागाला तात्काळ सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १५ दिवसांच्या अल्टिमेटममुळे आता नगरपरिषद प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

📌
ठेकेदाराने पुलाचे काम पूर्ण करून पुलाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आवश्यक होते परंतु तसे झालेले नाही. यापूर्वी देखील मी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन स्वच्छते बाबत सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते, यात नगरपालिकेला काही अडचण असल्यास त्यांनी पुढील येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय घ्यावा व म्हाळुंगी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावे.— साक्षी विनोद सूर्यवंशी, शिवसेना नगरसेविका.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 839
दयानंद गोरे नागरी समस्या निवेदन साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून…

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.