Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोले नगरपंचायतीतील सत्ताधारी भाजपमध्येच बंडाचे निशाण; विरोधकांसह नगरसेवकांचे साखळी उपोषण
आंदोलन

अकोले नगरपंचायतीतील सत्ताधारी भाजपमध्येच बंडाचे निशाण; विरोधकांसह नगरसेवकांचे साखळी उपोषण

आंदोलकांचा मुख्य रोख नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्यावर असून, वारंवार पत्राद्वारे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले:

अकोले नगरपंचायतीचा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, प्रशासकीय कारभार आणि पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून चक्क सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच आपल्या नेत्यांविरुद्ध बंडाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे, या वादात सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करत नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केल्याने संपूर्ण शहरात राजकीय खळबळ माजली आहे.

माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले नगरपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता असली, तरी सध्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी टोकाला पोहोचली आहे. नगरसेवकांनी आरोप केला आहे की, नगरपंचायतीच्या कारभारावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. कर्मचारी आणि अधिकारी आपल्या मनमानी पद्धतीने कारभार हाकत असून, नगरसेवकांनी सुचवलेल्या विकासकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. अनेक प्रभागांमधील कामांच्या निविदा मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामे सुरू होत नसल्याने नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

या आंदोलनामध्ये भाजपच्या माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, सभापती जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर, नगरसेवक सागर चौधरी, कविता शेळके, तमन्ना शेख यांच्यासह विरोधी गटाचे नगरसेवक नवनाथ शेटे आणि आरिफ शेख यांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलकांचा मुख्य रोख नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्यावर असून, वारंवार पत्राद्वारे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या आंदोलनाद्वारे विविध गंभीर मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. यामध्ये ३० मे २०२५ रोजीच्या सभेतील विषय क्रमांक २ मधील कथित फेरफार रद्द करणे, तसेच १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रत्यक्ष सभा न घेता कागदोपत्री दाखवलेले सर्व खोटे ठराव आणि टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, ५ जुलै २०२५ रोजी शासनाकडून प्राप्त झालेल्या चाळीस लाख रुपयांच्या रस्ता अनुदानाच्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याची आणि नगरपंचायतीचे खाजगीकरण थांबवण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवक एकाच वेळी उपोषणाला बसल्याने नगरपंचायतीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 499
अकोले नगरपंचायत साखळी उपोषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.