Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर एलसीबीची मोठी कारवाई; २५ लाखांच्या गांजासह दोघांना बेड्या
गुन्हेगारी

अहिल्यानगर एलसीबीची मोठी कारवाई; २५ लाखांच्या गांजासह दोघांना बेड्या

पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे आणि उमाकांत गावडे यांचा समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने ही धडक कारवाई केली. यामध्ये १३२ किलो गांजासह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कर्जत येथून पाथर्डीच्या दिशेने एका स्कॉर्पिओ गाडीतून (MH 14 GH 2330) दोन व्यक्ती गांजाची मोठी खेप घेऊन जात आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस निरीक्षक कबाडी यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मदतीने तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस पथकाने मिरजगाव ते कर्जत रोडवरील महात्मा फुले चौक येथील ब्रिजखाली सापळा रचला.

संशयित स्कॉर्पिओ गाडी येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवून तिची कसून तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये गणेश अंकुश कराड (वय ३२) आणि सुखदेव शिवनाथ कदम (वय ३०, दोन्ही रा. आगसखांड, ता. पाथर्डी) हे दोन इसम बसलेले आढळले. पोलिसांनी गाडीच्या डिक्कीची झडती घेतली असता, त्यामध्ये चार गोण्यांमध्ये भरलेला तब्बल १३२.८४ किलो ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी १८ लाख १८ हजार रुपये किमतीचा गांजा, ७ लाख रुपयांचे स्कॉर्पिओ वाहन आणि २५ हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर ६०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे आणि उमाकांत गावडे यांचा समावेश होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. अटकेतील आरोपींकडून या तस्करीचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा पुढील तपास मिरजगाव पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 561
अहिल्यानगर एलसीबी गांजा गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.